स्तुती करणारेच बनले टीकाकार
By admin | Published: October 5, 2014 02:37 AM2014-10-05T02:37:14+5:302014-10-05T02:37:14+5:30
ज्यांनी पाच महिन्यांपूर्वी माझी स्तुती केली, तेच आज मला शिव्याशाप देण्याकरिता स्पर्धा करीत आहेत. ज्यांची माङयासोबत मंचावर बसण्याची इच्छा नाही त्यांच्याबरोबर सरकार कसे चालवावे.
Next
>नरेंद्र मोदींचा शिवसेनेवर हल्ला : शिवराय ही कोणाची प्रॉपर्टी नाही -फडणवीस
बीड, औरंगाबाद अन् मुंबईत मोदींच्या भरगच्च सभा
मुंबई : ज्यांनी पाच महिन्यांपूर्वी माझी स्तुती केली, तेच आज मला शिव्याशाप देण्याकरिता स्पर्धा करीत आहेत. ज्यांची माङयासोबत मंचावर बसण्याची इच्छा नाही त्यांच्याबरोबर सरकार कसे चालवावे. मला पाहून ते दरवाजा बंद करतील, अशा शब्दांत नाव न घेता शिवसेनेला टोले लगावत विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
बीड, औरंगाबाद व महालक्ष्मी येथील जाहीर सभांनी मोदींच्या विधानसभा निवडणूक प्रचाराला प्रारंभ झाला. बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरची सहानुभूतीची लाट मतांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. औरंगाबादेत पर्यटनाच्या क्षमतेचा त्यांनी हेतूत: उल्लेख केला, तर दोन्ही सभांत शिवसेनेबाबत मौन पाळणा:या मोदींनी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील सभेत सेनेला टोले लगावले. 2022 मध्ये कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही. प्रत्येकाला पक्के घर, वीज, पाणी याची सोय केलेली असेल. नवी मुंबई विमानतळ, सी लिंक, मेट्रो हे प्रकल्प पूर्ण करू, असा दावा त्यांनी केला.
शिवजयंतीला हप्ते गोळा करणो अयोग्य
छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची मक्तेदारी नाही, असे सांगत शिवजयंतीच्या निमित्ताने हप्ते कोण गोळा करतात, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा नामोल्लेख न करता केला.
महाराष्ट्राला गुजरातच्याही पुढे नेऊन ठेवेन
महाराष्ट्रात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले तर दिल्लीत बसून आपण महाराष्ट्राची सेवा करू. आपल्याकडे पाहून मतदान करा. राज्यात भाजपाचे सरकार आल्यास महाराष्ट्राला गुजरातच्याही पुढे नेऊन ठेवेन. - नरेंद्र मोदी
राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टाचारवादी
बीड - गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर आपण महाराष्ट्रात प्रचाराकरिता आलो नसतो. आपल्याला ते लहान भावासारखे होते. त्यांची कमतरता आपल्याला जाणवू देणार नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी मुंडे यांच्या मृत्यूचे भावनिक राजकारण येथे केले.
राज्यात घडय़ाळ आणि हाताचे संगनमत झाले असून त्यांनी वेळेपूर्वीच तिजोरी साफ केली आहे, असा आरोप मोदी यांनी केला. महाराष्ट्र वाचला नाही तर देश वाचणार नाही. दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्य़ा दिसत असल्या तरी त्यांचे गोत्र एक आहे. व्यक्तिगत कारणास्तव त्यांनी दोन दुकाने उघडली आहेत; परंतु त्यांचे चरित्र, सवयी, हेतू एक आहेत. ही राष्ट्रवादी काँग्रेस नसून भ्रष्टाचारवादी काँग्रेस आहे.
औरंगाबाद - देशाला रोजीरोटी मिळवून देण्याचे काम केलेला महाराष्ट्र मागे राहिला. दिल्लीत मोदी सरकार यशस्वी व्हायचे असेल तर महाराष्ट्रात प्रगती होणो गरजेचे आहे, असे मत मोदी यांनी येथे व्यक्त केले. औरंगाबादचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असून, शहर स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.