सवलतींच्या पावसावर सदस्यांची टीका

By admin | Published: September 24, 2016 12:55 AM2016-09-24T00:55:55+5:302016-09-24T00:55:55+5:30

विविध सवलती देत असल्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मिळकत कर विभागाचे वाभाडे काढले.

Criticism of the members on the concessions rain | सवलतींच्या पावसावर सदस्यांची टीका

सवलतींच्या पावसावर सदस्यांची टीका

Next


पुणे : थकबाकीदार म्हणून सर्वसामान्यांच्या घरासमोर बँड वाजविणारा पालिकेचा मिळकत कर विभाग आयटी उद्योगांसह अनेक धनदांडग्यांना मात्र विविध सवलती देत असल्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मिळकत कर विभागाचे वाभाडे काढले.
माजी उपमहापौर आबा बागूल यांनी प्रश्नोत्तराच्या वेळेत हा विषय उपस्थित केला. शहरात ज्यांना करच लावला जात नाही, अशा एकूण ९६ हजार ८४० इमारती असल्याचे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले. प्रतिवर्षी १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक करवसुली यातून होऊ शकते, असे ते म्हणाले.
आयटी कंपन्यांना निवासी दराने कर लावला तर पालिकेचे ६५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
मालमत्ता जाहीर न करणाऱ्यांसाठी अभय योजना राबविली जाते, त्याची माहिती सर्वसाधारण सभेला दिली जात नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली. सुभाष जगताप, गणेश बीडकर, संजय बालगुडे आदी सदस्यांनी विविध प्रश्नांचा भडिमार प्रशासनावर केला. (प्रतिनिधी)
>शेतजमिनीला कर कसा लावणार, असे विचारताना गणेश बीडकर वारंवार समजा, मी एक साधा शेतकरी आहे, असे म्हणत होते. त्यांना उत्तर मिळत नव्हते. त्यावर अरविंद शिंदे आयुक्तांना म्हणाले, ‘‘त्यांना थोडा वेळ तरी साधा शेतकरी समजा व उत्तर द्या.’’ सभागृहात त्यामुळे हशा पिकला.

Web Title: Criticism of the members on the concessions rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.