भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची खोचक टीका; म्हणाले, "शरद पवारांचा चेहरा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 06:12 PM2023-02-15T18:12:44+5:302023-02-15T18:13:05+5:30

शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत असं पडळकर म्हणाले.

criticism of BJP MLA Gopichand Padalkar on Sharad Pawar | भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची खोचक टीका; म्हणाले, "शरद पवारांचा चेहरा..."

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची खोचक टीका; म्हणाले, "शरद पवारांचा चेहरा..."

googlenewsNext

धुळे - या महाराष्ट्रात जातीवाद पसरवणे, भ्रष्टाचार करणे, अनेक भागांना पाण्यापासून वंचित ठेवणे, मुलभूत सुविधा न देणे. राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री काय केले? देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य सांगितले आणि पवारांचा चेहरा डांबरासारखा काळा झालाय. त्यामुळे पवारांकडे उत्तर नाही. ते यावर बोलू शकत नाहीत. ते निरुत्तर आहेत अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनीशरद पवारांवर निशाणा साधला आहे. 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी १५ दिवसांपूर्वी पवारांच्या खेळीनं पहाटेचा शपथविधी झाला हे सांगितले होते. शरद पवारांचे राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय होत नाही हे पुन्हा सिद्ध झाले.सरकार मजबूत आहे. शिल्लक असलेली माणसं टिकवण्यासाठी काहींना सरकार कोसळणार अशी विधाने करावी लागतात असं त्यांनी सांगितले. 

तसेच विरोधी पक्षात असताना एकही आमचा आमदार फुटत नाही. पवारांची सत्ता गेल्यानंतर लगेच आमदार पळायला लागतात. मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेचे ५० आमदार गेले. अडीच वर्षात आमचा एकही आमदार म्हटला नाही मला पक्ष सोडायचा आहे. आम्ही विचाराने काम करतोय. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबावाखाली येऊन पक्षांतर करतोय असं म्हटलं नाही. त्यामुळे सरकार पूर्ण मजबूत आहे, काही चिंता करू नका असंही पडळकरांनी म्हटलं. 

दरम्यान शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. पवारांचा चेहरा आधीच विश्वासघाताने, गद्दारीने आणि पाठीत खंजीर खुपसण्यानं कालवंडलेला होता. मागच्या महिन्यात त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. फडणवीसांनी एकच विधान केल्यानं पवारांचा कालवंडलेला चेहरा आता डांबरासारखा काळा झाला अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे. 

फडणवीसांचं एक विधान अन् राज्यात पुन्हा चर्चा
पहाटेच्या शपथविधीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. परंतु, फडणवीसांनी पहिल्यांदाच हा दावा केलेला नाही. दोन वर्षांअगोदर नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान सर्वांत अगोदर फडणवीस यांनी यासंदर्भात गौप्यस्फोट केला होता व उघडपणे शरद पवार यांचे नाव घेतले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रपती शासनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र फडणवीसांनीच ‘ड्राफ्ट’ केल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. मात्र, त्यावेळी राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता त्यावर जास्त वादळ उडाले नव्हते. विशेष म्हणजे, ‘लोकमत’कडेच त्या वक्तव्याचा ‘व्हिडीओ’ होता.

Web Title: criticism of BJP MLA Gopichand Padalkar on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.