आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 04:45 PM2020-05-03T16:45:41+5:302020-05-03T16:47:17+5:30

सोशल मिडीयातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का ? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Criticized us in vulgar words, now BJP leaders complaining; Jayant Patil's allegation hrb | आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप

आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप

Next

सांगली : मागील काळात आमच्यावर अश्लील शब्दात टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आता जनतेच्या रचनात्मक टीकासुद्धा सहन होत नाहीत. त्यामुळे ते टीका थांबविण्यासाठी तक्रारी करुन रडीचा डाव खेळत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे केली आहे.

पाटील यांनी रविवारी ट्विटर अकाउंट वरून विरोधकांचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले आहे की, भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापुर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी. आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्यावरील टिका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहे, हेच स्पष्ट होते.

सोशल मिडीयातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का ? गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारीसुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहीय. भाजपाने रडीचा डाव खेळू नये. जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus धक्कादायक! रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; आरोग्य कर्मचारी भावाच्या बाईकवर बसून पसार झाला

IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...

लॉकडाऊन वाढला! तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले

Web Title: Criticized us in vulgar words, now BJP leaders complaining; Jayant Patil's allegation hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.