रॉकेलकपातीचे पुन्हा संकट!
By admin | Published: January 11, 2015 01:47 AM2015-01-11T01:47:33+5:302015-01-11T01:47:33+5:30
जवळपास ४० टक्के कपात करण्याची तयारी चालविल्यामुळे गोरगरिबांसाठी लवकरच ‘बुरे दिन’ सुरू होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.
‘बुरे दिन’ सुरू : घरगुती गॅसनंतर आता कें द्राची रॉकेलवर संक्रांत
नाशिक : मानसी ३ लीटर रॉकेल देण्याचे धोरण आखणाऱ्या सरकारनेच त्याच्या कोट्यात जवळपास ४० टक्के कपात करण्याची तयारी चालविल्यामुळे गोरगरिबांसाठी लवकरच ‘बुरे दिन’ सुरू होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.
घरगुती गॅस वापरावर केंद्र सरकारने लादलेले निर्बंध व त्यापाठोपाठ रॉकेलवरही आता संक्रांत येणार असल्याने सरपणासाठी वणवण भटकणे क्रमप्राप्त होऊ शकते. तीन वर्षांपासून सरकारने रॉकेलच्या कोट्यात टप्पाटप्प्याने कपात करण्यास सुरुवात केली असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात रॉकेल पात्र रेशनकार्डधारकांच्या संख्येच्या तुलनेत फक्त ३० टक्केच कोटा सरकारकडून दिला जात आहे. त्यामुळे मानसी ३ लीटर व जास्तीतजास्त १५ लीटर रॉकेल एका कुटुंबाला महिन्याकाठी मिळावे या सरकारच्याच निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. (प्रतिनिधी)
च्दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या अन्न व नागरी विभागाच्या बैठकीत राज्याचा आढावा घेण्यात येऊन त्यात लवकरच रॉकेल वापरावर निर्बंध लादण्याचे सूतोवाच करण्यात आले. त्यामागे राज्यात गॅस ग्राहकांची वाढलेली संख्या हेच प्रमुख कारण देण्यात आले आहे.
च्अनुदानित रॉकेल उपलब्ध करून देताना सरकारवर पडणारा आर्थिक बोजा हेदेखील प्रमुख कारण आहे. लवकरच जानेवारी ते मार्च महिन्यांसाठी कोटा निश्चित केला जाणार असून, त्यात कपात लागू होईल.