पीक विमा : शेतकरी उदासीन की सरकार?
By admin | Published: May 4, 2015 01:27 AM2015-05-04T01:27:30+5:302015-05-04T01:27:30+5:30
कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करीत आहे
कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने कृषी विमा योजना आणली खरी; परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे, उदासीनता दिसून येत आहे़
महाराष्ट्रातील स्थिती (स्रोत : कृषी विभाग)
२०१४-१५
मध्ये नैसर्गिक आपत्तीचा राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना फटका बसला.
जानेवारी ते एप्रिल २०१४
दरम्यान राज्यात ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
विदर्भातील १० जिल्ह्यांतील यवतमाळ, अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली.
मराठवाड्यातील
८ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, बीड, जालन्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली.
राज्यात १२ जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे.