शेतक-यांना आता पीक विम्याचा पर्याय!
By admin | Published: July 14, 2015 02:02 AM2015-07-14T02:02:13+5:302015-07-14T02:02:13+5:30
४९७.४९ कोटी मिळाले, पण वाटपातील दिरंगाईने शेतकरी अस्वस्थ.
पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील एका मॉलमध्ये सुरू झालेले ओलिस नाट्य तासाभरात संपले असून, पोलिसांनी सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्पेशल फोर्सने १८ ओलिसांची सुटका केली; पण ओलिस नाट्य घडविणाऱ्या सशस्त्र हल्लेखोरांना मारण्यात आले वा अटक झाली हे समजले नाही.
पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.३० वाजता तीन बंदूकधाऱ्यांनी क्वार्टझ नावाच्या मॉलमध्ये प्रवेश केला. मॉलमधील प्रिमार्क स्टोअर्समधील १० लोकांना त्यांनी ओलिस ठेवले.
एका महिला कर्मचाऱ्याने ही घटना मोबाईलवरून एसएमएस
करून आपल्या मित्राला कळविली. त्यानंतर ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस तातडीने दाखल झाले. (वृत्तसंस्था)
चोरीचा उद्देश असल्याचा अंदाज
पोलिसांच्या स्पेशल फोर्सने कारवाई करत सर्व १८ ओलिसांची मुक्तता केली. हल्लेखोर चोरी करण्याच्या उद्देशाने मॉलमध्ये गेले असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.