पीक विमा: शेवटच्या दिवशीही रांगा, ३० लाखांपेक्षा अधिक शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 05:00 AM2017-08-01T05:00:42+5:302017-08-01T05:00:48+5:30

Crop Insurance: Ranga on the last day, deprived more than 30 lakh farmers | पीक विमा: शेवटच्या दिवशीही रांगा, ३० लाखांपेक्षा अधिक शेतकरी वंचित

पीक विमा: शेवटच्या दिवशीही रांगा, ३० लाखांपेक्षा अधिक शेतकरी वंचित

googlenewsNext

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून वंचित असल्याचे ‘लोकमत’ला आढळले. नगर जिल्ह्यात सर्व्हरच बंद पडल्याने गोंधळ उडाला. नाशिकला योजनेस विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. बºयाच जिल्ह्यांत संध्याकाळपर्यंत पीक विमा काढलेल्या शेतकºयांची अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतक-यांना प्रचंड कसरत करावी लागली. रात्र-रात्र रांगा लावूनही अनेकांच्या पदरी निराशा आली.
जालना जिल्ह्यात चार लाख शेतक-यांनी पीक विमा भरला. मागील वर्षी साडेचार लाख शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. बीडमध्ये ५ लाख ५ हजार, नांदेडमध्ये चार लाख, लातूरला ३ लाख ८६ हजार, हिंगोलीत सव्वालाख, उस्मानाबाद जिल्ह्यात ५० हजार शेतकºयांनी पीक विमा उतरविला.
विदर्भातही ससेहोलपट-
नागपूर जिल्ह्यात ४४ हजार शेतकºयांना खरीप पीक कर्ज वाटप झाले असून त्यांना विम्याचे कवच मिळाले. बिगर कर्जदारांचाही विमा काढला जात आहे, त्यामुळे संख्या वाढणार आहे.
अमरावती जिल्ह्यात ३ लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ८१ हजार शेतकºयांनीच विमा काढल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. २ लाख १९ हजार शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
यवतमाळ जिल्ह्यात विविध बँकांच्या शाखांमध्ये सोमवारी शेतकºयांनी गर्दी केली होती. जिल्हा बँकेमार्फत २० हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी विमा काढल्याची माहिती सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे यांनी दिली. तर वर्ध्यातील १६ हजार
तर गडचिरोलीत १७ हजार, भंडाºयात ५४ हजार शेतकºयांनी पीक
विमा काढला.
पावणेदोन लाख शेतक-यांचा पीक विमा-
खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाख शेतकºयांनी पीक विमा उतविल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी ५९ हजार कर्जदार शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. यंदा मात्र केवळ १५ हजार सभासदांपुरताच विमा मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत.
पीक विम्यापासून वंचित
लातूर ७,७४,०००
नांदेड ३,६७,०००
हिंगोली २,२५,०००
परभणी २,००,०००
बीड १,५०,०००
अमरावती २,१९,०००
वर्धा ७९,०००
जालना ५0,०००
नाशिक ४१,०००
नगरला सर्व्हर डाऊन-
अहमदनगरला सोमवारी सरकारचे संकेतस्थळ सकाळी दहानंतर बंद होते़ त्यामुळे शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल करणारे शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत़ जिल्ह्यात अंदाजे २ लाख शेतकरी विविध बँकांचे कर्जदार आहेत़

Web Title: Crop Insurance: Ranga on the last day, deprived more than 30 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.