पीक संरक्षण योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 09:03 AM2018-10-04T09:03:00+5:302018-10-04T09:03:00+5:30
माझी योजना : पिकांवरील कीड रोगांचे सर्वेक्षण करून त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांकडून लाभार्थ्याला सल्ला दिला जातो.
पीक संरक्षण योजनेंतर्गत फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प ही योजना राज्य शासनामार्फत राबविली जाते. आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी व चिकू या पिकांवरील कीड रोगांचे सर्वेक्षण करून त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांकडून लाभार्थ्याला सल्ला दिला जातो. तसेच लागणारी कीटकनाशके ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकीच कागदपत्रे लागतात. सातबारा व ८- अ चा उतारा असावा. या कागदपत्रांसह शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालयात अर्ज करावा. योजनेंतर्गत कीड सर्वेक्षकामार्फत प्रत्यक्ष बागांना भेटी देऊन कीड/रोगाबाबत निरीक्षणे घेतली जातात. त्यानंतर राष्ट्रीय संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठे यांच्या मदतीने सल्ले तयार करून एस.एम.एस.द्वारे शेतकऱ्यांना उपाययोजनेची माहिती दिली जाते. आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर प्रादुर्भाव गेल्यावर आपत्कालीन परिस्थितीत ५० टक्के अनुदानावर औषधी तालुकास्तरावरून उपलब्ध करून दिली जातात.