पावसाच्या अनियमिततेचा पिकांना फटका

By admin | Published: April 11, 2017 01:13 AM2017-04-11T01:13:37+5:302017-04-11T01:13:37+5:30

राज्यातील २२५ लाख हेक्टरपैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेला बसत असल्याने या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या

Crop rampant crop rains | पावसाच्या अनियमिततेचा पिकांना फटका

पावसाच्या अनियमिततेचा पिकांना फटका

Next

मुंबई : राज्यातील २२५ लाख हेक्टरपैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेला बसत असल्याने या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर काही शेतीपूरक कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाणी लागणाऱ्या उत्पादनाची निर्मिती केल्याने शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.
कोरडवाहू क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनांचे नियोजन, तसेच कृषीपूरक उपक्रमांसाठी साहाय्य केल्यास कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल, उत्पन्नाचे सातत्य टिकवता येईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल, या उद्देशाने राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियानाची गतवषार्पासून सुरुवात केली होती.
सरकारने जलसंचय व्यवस्थापन कार्यक्रमासह एकात्मिक शेती पद्धती, मूल्यवर्धित शेती विकास, सेंद्रिय शेती कार्यक्रम, काढणीपश्चात साठवूणक, प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण आदी विकासात्मक बाबींवर भर दिल्यास कोरडवाहू शेतीला जीवदान मिळू शकते. कोरडवाहू क्षेत्रात पाणी हा महत्त्वाचा घटक असल्याने पावसाच्या पाण्याची साठवण, नियोजन आणि वापर अर्थात मूलस्थानी जलसंवर्धन यावर भर दिला जावा, अशा शिफारशी तज्ज्ञांनी केल्या आहेत.जागतिक हवामान बदलामुळे कोरडवाहू शेतीची अनिश्चितता वाढली आहे. पाण्याची कमतरता, पर्यायाने पाण्याचा ताण पिकातील चयापचय क्रियांवर होणारा विपरित परिणाम यामुळे पिकांच्या विकासात बाधा येते. अशा कोरडवाहू पिकांना स्थैर्य देण्यासाठी पाणलोट विकास अंतर्गत मूलस्थानी जलसंधारण, मृदा संधारण, पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, शेततळ्यात साठलेले पाणी सूक्ष्म सिंचनाच्या मध्यमातून कोरडवाहू पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी वापरणे, आदी उपाय गरजेचे आहेत. त्यामुळे कोरडवाहू पिकांना वाढीच्या काळात ओलावा मिळून उत्पादकता वाढीसाठी मदत होते. (प्रतिनिधी)

‘झेबा’चा कसा वापर करावा?
इष्ट परिणामांसाठी झेबा हे द्रवशोषक बीजारोपण, रोपणासोबत एकरी पाच किलो मूलभूत खतासोबत वापरणे अधिक चांगले असते. यासाठी कोणतेही विशिष्ट अवजार लागत नाही.

झेबा द्रवशोषक उपयुक्त :
यूपीएलचे नावीन्यपूर्ण उत्पादन
यूपीएल कंपनीच्या झेबा या द्रवशोषकामुळे पीक चांगले येतेच शिवाय जमिनीचा पोतही सुधारतो. जमिनीतील आद्रता सुधारून बीज, रोपांसह मुळांचीही निकोप वाढ होते. पाण्याची टंचाई किंवा दुष्काळी भागातील शेतीसाठी झेबा खूपच परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे.

१,८८८ हेक्टरला फायदा
जालन्यापासून १८ किलोमीटर अंतरावरील कडवांची येथे कृषी विज्ञान केंद्रामार्फत पाणलोट प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कडवांची गावासह एकूण १,८८८ हेक्टर क्षेत्राला फायदा झाला.

- राज्यातील कोरडवाहू पिकांखालील क्षेत्र :
८२ टक्के
पाणलोटाखाली आणण्यात येणारे क्षेत्र :
२४१ लाख हेक्टर
पाणलोट विकासाचे काम पूर्ण झालेले क्षेत्र :
१२५.६५ लाख हेक्टर
विकासाच्या प्रतीक्षेत असलेले क्षेत्र :
११५.३५ लाख हेक्टर
मराठवाडा : ४५.१५ लाख हेक्टर
विदर्भ : 0.५५ लाख हेक्टर
उर्वरित महाराष्ट्र : ४९.६५ लाख हेक्टर

प्रत्येक पीक हे जगले पाहिजे आणि त्यातून जास्तीतजास्त उत्पादन मिळाले मिळाले पाहिजे, हा यूपीएल चा उद्देश आहे. झेबा हे एक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने विकसित केलेले यूपीएलचे उत्पादन आहे. याच्या वापरामुळे पिकाच्या मुळाशी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अनेक पटींनी वाढते आणि पीक पूर्ण विकसित होईपर्यंत त्यास आवश्यक पाण्याचा पुरवठा निश्चित होऊन आवश्यक पोषणमूल्य देत राहते. यामुळे शेतकऱ्यांचे पीक उत्पादन वाढते आणि पर्यायाने त्यांच्या उत्पन्नात वाढ होते.
- नवीन छहाल, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक,
पाणी आणि जमीन तंत्रज्ञान, यूपीएल

मी झेबा खतामध्ये एकत्र करून डाळिंब पिकामध्ये वापर केला. त्यामुळे पाण्यामध्ये बचत झालीच, परंतु जी खते पाण्याबरोबर वाहून जायची, ती झेबामुळे मुळाच्या कक्षेमध्ये टिकून राहिले. बागेमध्ये पानाचा आकार आणि फुलांची संख्या जास्त होऊन डाळी जाण्याचे प्रमाण कमी झाले आणि पाण्यामध्येपण बचत झाली.
- केटू वसंत वाघमारे, रेडगाव, ता. निफाड, जि. नाशिक, शेतकरी

राज्याच्या विकासासाठी कोरडवाहू शेती अभियान मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे सरकारने असे अभियान पुन्हा सुरू करावे.
- डॉ. यशवंतराव थोरात, माजी अध्यक्ष, कोरडवाहू शेती अभियान

Web Title: Crop rampant crop rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.