सव्वा लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा गारपिटीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:33 AM2018-02-13T05:33:01+5:302018-02-13T05:34:12+5:30

राज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यांतील सुमारे ५० तालुक्यांमधील १,0८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. सोमवारी नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत पुन्हा गारपीट झाली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Crops on 9 lakh hectares of earthquake; Blowing hail again in Vidarbha, Marathwada | सव्वा लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा गारपिटीचा इशारा

सव्वा लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा गारपिटीचा इशारा

googlenewsNext

मुंबई : राज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यांतील सुमारे ५० तालुक्यांमधील १,0८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. सोमवारी नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत पुन्हा गारपीट झाली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
पुढील ४८ तासांमध्ये विदर्भात विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग व मराठवाड्याच्या बहुतांश भागात पुन्हा गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बुलडाणा, अमरावती, जालना जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसांत नुकसानीचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. सोमवारी बाधित जिल्ह्यांमध्ये कृषी अधिकाºयांनी पाहणी केली.

११ जिल्ह्यांमध्ये नुकसान
बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, जळगाव

हनुमान चालिसा हा गारपिटीवर उतारा!
पुढील चार-पाच दिवस गारपीट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर या संकटातून वाचण्यासाठी मध्य प्रदेशच्या सिहोरमधील भाजपाचे नेते व माजी आमदार रमेश सक्सेना यांनी शेतकºयांना हनुमान चालिसाचा सामुहिक पाठ करण्याचा अजब सल्ला दिला. प्रत्येक गावात दररोज एक तास या प्रमाणे पाच दिवस हनुमान चालिसाचा सामुहिक पाठ केला तर कोणत्याही नैसर्गिक आपत्ती फिरकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

Web Title: Crops on 9 lakh hectares of earthquake; Blowing hail again in Vidarbha, Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.