धरणाखालील पिके होरपळणार

By Admin | Published: November 25, 2015 01:07 AM2015-11-25T01:07:14+5:302015-11-25T01:07:14+5:30

सोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

Crops under the dam | धरणाखालील पिके होरपळणार

धरणाखालील पिके होरपळणार

googlenewsNext

बापू बैलकर,  पुणे
सोलापूरला उजनी धरणामध्ये पुण्यातील चार धरणांमधून १० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पण जर हे पाणी सोडले, तर या धरणाखालील पिके होरपळून जातील. चासकमान लाभक्षेत्रासाठी रब्बीसाठी एकच आवर्तन मिळणार असून, पुढील ७ महिने त्यांना पाणी...पाणी.. करावे लागणार आहे. त्यामुळे सोलापूरसाठी आवश्यक साठा उजनीत असताना, आमच्या धरणातून पाणी कशासाठी, असा सवाल येथील शेतकरी करीत आहे.
पाणी सोडू नका, यासाठी खेड-शिरूरमधील शेतकऱ्यांनी जलस्रोत प्राधिकरणाकडे विनवनी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर, न्यायालयात धाव घेतली. आता ३0 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मात्र, आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर, शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहे. गेल्या महिनाभरापासून हे प्रकरण गाजत आहे.
सोलापूरची पाण्याची गरज काय? व येथील धरणातून पाणी सोडल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याची माहिती घेतली असता, चासकमान व भामाआसखेड धरणाखालील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे.
चासकमान धरणाची
क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ९0 दलघमी पाणी
सोडण्याचे आदेश आहेत. ३९.८५ दलघमी पाणी येथील शेतीसाठी शिल्लक राहील. यातून फक्त एक आवर्तन होईल. हे आवर्तनही आता सोडले आहे. त्यामुळे शेतीसाठीचे पाणी शिल्लकच राहणार नाही. परत शेतकऱ्यांना पाण्यासाठी पुढील सात महिने पाणी मिळणार नाही. त्यामुळे येथील पिकं होरपळून जाण्याची शक्यता आहे.
चासकमान व भामाआसखेड धरणाखालील ४0 हजार हेक्टरक्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. तर, सोलापूरमधील आतापर्यंत ५ हजार एकर क्षेत्राचीच पाण्याची मागणी झाली आहे. जेव्हा आदेश झाले, तेव्हा तर फक्त ५00 हेक्टरचीच मागणी होते. असे असताना १ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पुरेलएवढे पाणी सोडण्याची गरज काय, असा सवाल याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे व धयर््ौशील पलांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
1सोलापूरची ५ हजार एकर क्षेत्राची आतापर्यंत पाण्याची मागणी आहे. तसेच, अवघे अडीच टीएमसी पाणी पिण्यासाठी लागते. उजनी धरणात १८0३ दलघमी म्हणजे, ६४ टीएमसी अचलसाठा आहे. सरकारच्या परवानगीने तो वापरता येतो. २0११ पासून तो वापरलाही जात आहे. २0११ साली ६ टीएमसी, २0१२ साली ३0 टीएमसी, २0१३ साली १२ टीएमसी व २0१४साली १५ टीएमसी पाणी या अचलसाठ्यातून वापरले आहे. 2मग आताही यातून पाणी वापरणे शक्य असताना पुण्यातील धरणातून पाणी सोडण्याची गरज काय आहे, जर पिण्यासाठीच पाणी सोडले जात आहे, तर सोलापूरला अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. मग ६१ टीएमसी पाणी अचलसाठ्यात असताना, ते का सोडले जात नाही, असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत.

Web Title: Crops under the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.