पंढरपुरातील गरिबांचा विठ्ठल बनला कोट्यधीश

By Admin | Published: July 13, 2017 02:25 PM2017-07-13T14:25:42+5:302017-07-13T14:43:35+5:30

गरिबांचा, शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा देव म्हणून पांडुरंगाची ख्याती आहे. तरीही आषाढी वारी काळात म्हणजेच २४ जून ते ९ जुलै दरम्यान वारकऱ्यांनी देणगी देत पांडुरंगाला कोट्यधीश बनविले आहे.

The crorepati of Vishthal from the village of Pandharpur | पंढरपुरातील गरिबांचा विठ्ठल बनला कोट्यधीश

पंढरपुरातील गरिबांचा विठ्ठल बनला कोट्यधीश

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत 
पंढरपूर दि.13 - गरिबांचा, शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा देव म्हणून पांडुरंगाची ख्याती आहे. तरीही आषाढी वारी काळात म्हणजेच २४ जून ते ९ जुलै दरम्यान वारकऱ्यांनी देणगी देत पांडुरंगाला कोट्यधीश बनविले आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला एकूण २ कोटी ६८ लाख ६९ हजार ५१४ रुपयांची देणगी जमा झाली आहे़ त्यात श्री विठ्ठलाच्या पायावरील ४२ लाख ५१ हजार ५८९ रुपये तर रुक्मिणी मातेच्या पायावरील ७ लाख ६५ हजार ८८३ रुपयांच्या देणगीचा समावेश असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ़ विजय देशमुख यांनी सांगितली़
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देणगी पावतीच्या माध्यमातून १ कोटी ३९ लाख ५३ हजार १०२ रुपयांची देणगी जमा झाली़ तसेच पुणे येथील श्री विठ्ठल सेवा मंडळाच्या १५० हून अधिक स्वयंसेवकांनी मंदिर परिसरात ठिकठिकाणी देणगी कक्ष उभारले होते़ या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली आहे़
२४ तास दर्शन चालू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या पायावरील २ लाख ६ हजार ८ रुपयांची देणगी जमा झाली होती़ ती पुढील काळात वाढतच राहिली़ ४ जुलै रोजी एकादशीदिवशी ४ लाख १४ हजार ५५५ रुपयांची देणगी जमा झाली़ या दिवशी आषाढी वारी काळातील सर्वाधिक देणगी जमा झाली़
याशिवाय लाडू प्रसाद विक्रीतून ३३ लाख ५ हजार १२० रुपये तर राजगिरा लाडू विक्रीतून ६ लाख ५० हजार ३०० रुपये जमा झाले आहेत़ त्याचप्रमाणे फोटो विक्रीतून ९१ हजार २०० रुपये, वेदांता भक्तनिवास १ लाख ८१ हजार ६०० रुपये, व्हिडीओकॉन भक्त निवास १ लाख ७० हजार ८०० रुपये, अन्नछत्र कायम ठेव ४ लाख ५६ हजार १२२ रुपये, महानैवेद्य ठेव ७५ हजार रुपये, मनीआॅर्डर ३९ हजार ६१७ रुपये, साडी सेल ६८ हजार ६५० रुपये, दानपेटीतून मिळालेली रक्कम १५ लाख ४४ हजार ६४४ रुपये, आॅनलाईन देणगी १ लाख १४ हजार ९८८ रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे़
याशिवाय मंदिर समितीच्या ताब्यात असलेल्या परिवार देवतांच्या ठिकाणाहून ८ लाख १ हजार ३७३ रुपये, आॅनलाईन देणगी सुविधा देत असताना एसबीआयच्या खात्यावर ४ हजार १५३ रुपये, एफएफटीद्वारे भक्तनिवास भाडे ९३ हजार ९५० रुपये, आॅनलाईन पाद्यपूजा ५ हजार रुपये, आॅनलाईन अन्नछत्र कायम ठेव ५ हजार रुपये, आॅनलाईन अन्नछत्र देणगी १५ हजार २०० रुपये अशा प्रकारे विविध माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला आषाढी यात्रा कालावधीत एकूण २ कोटी ६८ लाख ९६ हजार ५१४ रुपयांची देणगी जमा झाल्याची माहिती लेखाधिकारी रवींद्र वाळूजकर यांनी सांगितली़
-------------------------
पावणे सात लाख भाविकांनी घेतले पददर्शन
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर इकडे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली़ त्यामुळे मंदिर समितीने २४ जूनपासून ९ जुलैपर्यंत या कालावधीत व्हीआयपी पास आणि आॅनलाईन दर्शन सेवा बंद करून २४ तास दर्शनरांग सुरू ठेवली़ त्यामुळे या काळात एकूण ६ लाख ६६ हजार भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले आहे़

Web Title: The crorepati of Vishthal from the village of Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.