सिंचन विहिरीत कोटींचा घपला
By admin | Published: February 27, 2017 03:06 AM2017-02-27T03:06:33+5:302017-02-27T03:06:33+5:30
२०११-१२ मध्ये मंजूर झालेल्या ६०७ विहिरींपैकी शेकडो विहिरी कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून करोडो रुपयांचा घपला केल्याचा आरोप मनसेने केला
विक्रमगड : या तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सन - २०११-१२ मध्ये मंजूर झालेल्या ६०७ विहिरींपैकी शेकडो विहिरी कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून करोडो रुपयांचा घपला केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
असंख्य लाभार्थ्यांना विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही. एका विहीरीचा खर्च १ लाख ९० हजार रुपये असल्याने यात कोटयवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे परेश रोडगे यांनी केलेल्या तपासणीमध्ये आढळल्याचे त्यांनी म्हटले असून या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी ते शुक्रवार पासून उपोषण करणार आहेत. त्यांनी सहा महिन्यापूर्वी याबाबत चौकशीची मागणी करणारे पत्र गट विकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने अखेर त्यांनी ३ मार्च रोजी न्यायासाठी उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे़
सन-२०११-१२ या आर्थिक वर्षातील सिंचन विहीरींंमध्ये झालेल्या भ्रष्टांचाराची चौकशीसाठी पत्र दिले होते त्याअनुषंगाने पाठपुरावा देखील करण्यात आलेला होता त्यानुसार गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता आर. एस. अभंगराव व एस एन पाटील, लघु पा़टबंधारे विभागाचे शाखा अभियंता के ज़े़ संखे, एस एस शेख, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे तांत्रिक अधिकारी बी एम पाटील व एस एस गांगोडा यांना दिले होते.
मात्र ७ महिन्याच्या कालावधीमध्ये काहीच हालचाल न झाल्याने १३ डिसेंबर २०१६ रोजी तालुका मनसेच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्याच इशारा देण्यात आला होता़ परंतु त्यावेळी गट विकास अधिकाऱ्यांंनी २० डिसेंबर रोजी १ महिन्याची मुदत कारवाई करण्यासाठी मागितली व तसे लेखी आश्वासन मनसेला दिले होते त्यानुसार हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र हा ही कालावधी निघून गेला असून आजतागायत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याने ३ मार्च रोजी उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हा सचिव सतीश जाधव यांनी सांगितले आहे़ आता संबंधीत खात्याचे अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
>अशी आहे दारुण वस्तुस्थिती
सन-२०११-१२ मध्ये ६०७ सिंचन विहीरींचे कामे हाती घेण्यात आली होती त्याअनुषंगाने आॅनलाईन रेकॉर्डवर ४३६ विहीरी पूर्ण झाल्याचे दाखविले आहे़ तर ५७ विहींरीची कामे अपूर्ण आहेत व ८ विहीरींची कामे सुरु नाही तर १०८ विहीरंी रदद केल्याचे दाखविले आहे़ याकरीता ६ कोटी ५० लाख रुपये खर्च झाल्याचेही दाखविले आहे़ मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही, मनसेकडून करण्यांत आलेल्या सर्व्हेनुसार फक्त १४५ विहीरींची कामे पूर्ण झाली असून बाकी सर्व विहीरी अपूर्णच आहेत. त्यासाठीची जवळ जवळ १२ कोटी ५० लाखांची रक्कम काढली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ तालुक्यातील ६०७ विहीरींपैकी सर्वच विहीरींची कामे अपुर्ण आहेत, एका विहीरीस 1कोटी ९० हजार रुपये मंजूरी असल्याने व ही कामे न करतांच संपूर्ण निधी काढलेला दिसत आहे़. त्यामुळे जवळ जवळ १२ कोटी ५० लाखांचा भ्रष्टांचार झाल्याचा आमचा आरोप आहे व त्याप्रमाणे चौकशी होणे गरजेचे आहे़
-परेश रोडगे,
मनसे तालुका विक्रमगडहा प्रकार सन-2011-12 मधील असून मी आताच नव्याने प्रभारी चार्ज घेतलेला आहे़ तसेच याबाबत त्यावेळेस तपासण्या झालेल्या असून त्यांचा अहवाल सादर केलेला नाही, या विभागामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांकडे तीनतीन तालुक्यांचा भार असून ते देखील प्रभारीच आहेत़ तसेच या विभागातील सर्वच पदे रिक्त असल्याने याबाबतचे काम थोडे हळू चालू आहे़ मात्र सखोल चौकशी होईल़
-प्रदिप डोल्हारे,
प्ऱ गटविकास अधिकारी प़ं स़ विक्रमगड