दारू खरेदीसाठी भोर शहरात गर्दी

By admin | Published: April 6, 2017 12:54 AM2017-04-06T00:54:59+5:302017-04-06T00:54:59+5:30

भोर शहरातील व आसपासची सात दुकाने, तर महामार्गावरील २६ अशी एकूण ३३ दारूची दुकाने बंद झाली आहेत.

The crowd gathered in the city to buy liquor | दारू खरेदीसाठी भोर शहरात गर्दी

दारू खरेदीसाठी भोर शहरात गर्दी

Next

भोर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रीय महामार्गवर राज्य मार्गालगतच्या ५०० मीटर अंतरावरील परमिट रूम, बिअरबार, देशी दारू, बिअर शॉपीची दुकाने बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे भोर शहरातील व आसपासची सात दुकाने, तर महामार्गावरील २६ अशी एकूण ३३ दारूची दुकाने बंद झाली आहेत. मात्र, भोर शहरातील दोन वॉईनशॉप कायद्याच्या कचाट्यातून सुटल्याने भोर तालुक्यासह पुणे-सातारा महामार्गावरील व शिरवळ, खंडाळा येथील लोक दारूखरेदीसाठी शहरात एकच गर्दी करीत आहेत.
एक एप्रिलनंतर उत्पादनशुल्क विभागाकडून दुकाने सील करण्यात आली. यात भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाड-पंढरपूर रोडवरील दोन बिअरबार व एक बिअर शॉपी अशी तीन, तर भोर-कापूरव्होळ रोडवरील दोन बिअरबार अशी पाच दुकाने, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील एक वॉईन शॉप, १४ बिअरबार व ११ बिशर शॉपी अशी २६ तर एकूण ३१ दुकानांना सील लागले आहे.
ही दुकाने बंद झाल्याने कुठेच दारू मिळत नसल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. मात्र, खंडाळा येथे एक बिअरबार व भोर शहरातील दोन वॉईनशॉप न्यायालयाच्या कायद्याच्या कचाट्यातून सुटले आहेत. भोर तालुक्यातील शहर व ग्रामीणसह महामार्गावरील तळीरामांनी आपला मोर्चा भोर शहरातील वॉईन शॉपकडे वळविला आहे. शहरातील दोन्ही दुकानांत एकच गर्दी होत आहे. तर, शासनाच्या या कारवाईनंतर अवैध देशी व हातभट्टी दारूविक्रीला ऊत आले आहे. (वार्ताहर)
आता फार्म हाऊसवर जाऊन पार्ट्या
न्यायालयाच्या निर्णयामुळे अवैध दारूधंदे बंद झाल्यामुळे दारू पिऊन पडणारे आणि दारूची दुकाने उघडण्याची वाट पाहणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावांत अद्यापही देशी व हातभट्टी दारूची सर्रास विक्री होत आहे. महामार्गावरील बिअरबारमध्ये जाऊन मौैजमजा व पार्ट्या करणाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली असून, त्यामुळे फार्म हाऊसवर जाऊन होणाऱ्या पार्ट्या वाढल्या आहेत.

Web Title: The crowd gathered in the city to buy liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.