संमेलनात नेत्यांचीच गर्दी
By admin | Published: January 24, 2017 04:09 AM2017-01-24T04:09:56+5:302017-01-24T04:09:56+5:30
साहित्य संमेलनात राजकारण्यांचा वावर कमीतकमी असावा, अशी स्वत:चीच सूचना बाजूला ठेवत साहित्य महामंडळाने
डोंबिवली : साहित्य संमेलनात राजकारण्यांचा वावर कमीतकमी असावा, अशी स्वत:चीच सूचना बाजूला ठेवत साहित्य महामंडळाने सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा भरगच्च सहभाग असलेली संमेलनाची कार्यक्रम पत्रिका सोमवारी जाहीर केली. डोंबिवलीत होणाऱ्या तीन दिवसांच्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद््घाटनाला मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहतील; तर समारोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडेल.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी ही बहुप्रतीक्षित कार्यक्रम पत्रिका जाहीर केली. संमेलनासाठी क्रीडा संकुलात उभारण्यात येणाऱ्या साहित्यनगरीला भाषाप्रभू पु. भा. भावे यांचे नाव देण्यात येणार आहे. मुख्य सभा मंडपाला ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचे नाव दिले जाणार आहे. य् एका मंडपाला पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी यांचे नाव दिले जाणार आहे. काही कार्यक्रम सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात होणार आहेत. प्रकाशन मंच उभारला जाणार आहे. संमेलनाच्या ग्रंथ दालनात विविध प्रकाशकांचे ३५० स्टॉल आहेत
पहिल्या दिवशी ३ फेूब्रुवारीला सकाळी डोंबिवलीच्या गणेश मंदिरापासून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्याचे नियोजन अच्युत कऱ्हाडकर यांच्याकडे आहे. मराठी भाषकांव्यतिरिक्त कानडी, बंगाली, गुजराती भाषक मंडळी त्यात सहभागी होणार आहेत. पु. भा. भावे संमेलननगरीत ग्रंथ दिंडी पोहोचल्यावर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण होईल. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
असे असतील साहित्य संमेलनाचे भरगच्च कार्यक्रम
३ फेब्रुवारी : सायंकाळी ४ वाजता शं. ना. नवरे सभामंडपात उद््घाटन समारंभ होईल. त्यात डॉ. श्रीपाल सबनीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर सहभागी होतील.
सायंकाळी ७ वाजता पहिले कवी संमेलन होईल. त्यांच्या अध्यक्षस्थानी सुखदेव ढाणके असतील. त्यात अशोक बागवे, महेश केळुसकर, प्रसाद कुलकर्णी, प्रल्हाद सोनेवाने, अनुपमा उजगरे, देविदास फुलारी, राजा होळकुंदे, इंद्रजीत घुले, प्रमोदकुमार आणेराव, मनीषा साधू आदी सहभागी होणार आहेत.
४ फे ब्रुवारी : सकाळी कवी संमेलनात मनोहर नरांजे, मीना खोंड, इंदुमती सुतार, सुलभा कोरे आदी सहभागी होतील. याचे सूत्रसंचालन डी. बी. जगत्पुरिया करणार आहेत. त्यानंतर शं. ना. नवरे सभामंडपात सकाळी ९ वाजता प्रसिध्द उद्योजक जयंत म्हैसकर आणि चित्रपट निर्मात्या अनुया म्हैसकर यांची प्रकट मुलाखत घेतली जाईल. सकाळी ११ वाजता ज्येष्ठ विज्ञान कथा लेखक जयंत नारळीकर, ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांचा सत्कार करण्यात येईल. त्याचे सूत्रसंचालन दीपाली केळकर करतील.
दुपारी १२ वाजता बालकुमार मेळावा होईल. त्यात बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले? यावर परिसंवाद पार पडेल. अध्यक्षस्थानी डॉ. न. म. जोशी असतील. या मेळाव्याचे उद््घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड करतील. यात एकनाथ आव्हाड, सुरेश सावंत, शोभा भागवत, नरेंद्र लांजेवार, राजीव तांबे सहभागी होतील. कार्यक्रमाचे समन्वयक मयुरेश साने असतील.
दुपारी १ वाजता ‘बालकुमार प्रतिभाविश्व’ हा स्थानिक बालकुमारांच्या स्वरचित कविता, कथाकथन, भाषणांचा कार्यक्रम होईल. त्याचे समन्वयक अस्मिता पांडे आणि सौरभ सोहोनी आहेत. वर्षा भावे, डॉ .सलील कुलकर्णी यांचा त्यात सहभाग असेल. दुपारी २ वाजता ‘शोध युवा प्रतिभेचा’ यात ‘आम्हालाही काही सांगायचंय!’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी जयप्रद देसाई, अनिकेत आमटे, सुबोध भावे उपस्थिती राहतील. दुपारी ४ वाजता ‘युध्दस्थ कथा’ यावर परिसंवाद होईल. त्यात निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, निवृत्त एयर मार्शल भूषण गोखले, कर्नल अभय पटवर्धन, भारतीय पोलीस सेवेतील विश्वास नांगरे-पाटील सहभागी होतील. अनुराधा प्रभूदेसाई त्याच्या समन्वयक असतील.
सावित्रीबाई फुले कलामंदिरात सकाळी ९ वाजता अध्यक्षीय भाषणावर चर्चा होणार आहे. त्यात विजय चोरमारे, भानू काळे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते सहभागी होतील. श्याम जोशी समन्वयक असतील. सकाळी ११.३० वाजता ‘बदलती अर्थव्यवस्था : समाजाचे विघटन आणि मराठी लेखन’ हा परिसंवाद होईल. अनिल बोकील अध्यक्षस्थानी असतील. त्यात डॉ. जगदीश कदम, यमाजी मालकर, सारंग दर्शने, डॉ. श्रीकांत बाराहाते, चंद्रशेखर टिळक सहभागी होतील. सूत्रसंचालन वीरेंद्र तळेगावंकर करतील. दुपारी १२ वाजता ‘ग्रामीण स्त्री : वास्तवातील व साहित्यातील’ यावर परिसंवाद होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मधुकर वाकोडे असतील. त्यामध्ये डॉ. प्रवीण बांदेकर, सुशीला मुंडे, डॉ. राजेंद्र माने, प्रा. ललिता गादगे, डॉ. ईश्वर नंदपुरे सहभागी होतील. सूत्रसंचालन प्रा. वृंदा भुस्कटे करतील. दुपारी ४ वाजता टॉक शो होईल. त्यात ‘साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व’ यावर चर्चा होईल. प्रा. रा. रं बोराडे, मल्हार अरणकल्ले, डॉ. उदय निरगुडकर, संजय आवटे, अरूण म्हात्रे, प्रकाश एदलाबादकर सहभागी होतील. त्याचे समन्वयक रवींद्र रक्मिणी पंढरीनाथ असतील. सायंकाळी ५ वाजता ‘कवी, कविता, काव्यानुभव’ यामध्ये प्रभा गणोरकर, संदीप खरे, अशोक नायगावकर, श्रीकांत देशमुख सहभागी होतील. त्याचे समन्वयक किरण लेले असतील. सायंकाळी ७ वाजता ‘आंतरभारती’ हे स्थानिकांचे बहुभाषक संमेलन होईल. त्यात गुजराती, तेलगू, कन्नड, भोजपुरी, मल्याळी, बंगाली, तमीळ भाषांचा समावेश असेल. सूत्रसंचालन विजय पंडित करतील.
डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात ‘पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता’ यावर परिसंवाद होईल. त्यात नीरजा, प्रा. राजेंद्र दास, डॉ. नरेशचंद्र, प्रा. भास्कर चंदनशीव, देवेंद्र गावंडे, राकेश वानखेडे सहभागी होतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बाळकृष्ण कवठेकर असतील. चांगदेव काळे सूत्रसंचालन करतील. दुपारी १.३० वाजता नवोदित लेखकांचा मेळावा होईल. या मेळाव्याचे उद्घाटन चिन्मय मांडलेकर यांच्या हस्ते होईल. पहिल्या चर्चेत ‘नवोदित लेखन : अपेक्षा आणि आव्हाने’ यात मनस्विनी लता रवींद्र, रवी कोरडे, प्रशांत आर्वे, घन:श्याम पाटील सहभागी होतील. दुसऱ्या चर्चेत दुपारी ३.३० वाजता ‘नवे लेखक : नवे लेखन’ हा विषय घेण्यात आला आहे. यात अमृता सुभाष, आशुतोष जावडेकर, डॉ. अरूधंती वैद्य सहभागी होतील. सायंकाळी ५ वाजता ‘नवे कवी : नवी कविता’ हा कार्यक्रम होईल. त्यात निवडक पाच कवींचे- हर्षदा सौरभ, माधवी मुठाळ, गोविंद नाईक, चेतन फडणवीस, गिरीश खारकर कवीसंमेलन होईल. समन्वयक स्पृहा जोशी असतील. कवीकट्टा, तीन दिवस चालणारे काव्यहोत्र, गझल व बोलीभाषेतील काव्यवाचन यांचे समन्वयक राजन लाखे असतील. प्रकाशन मंचाचे समन्वयक सुधाकर भाले असतील.
शनिवार, ५ फेबु्रवारी : शं. ना. नवरे सभामंडपात सकाळी ९.३० वाजता दुसरे कवीसंमेलन पार पडेल. त्यांच्या अध्यक्षस्थानी शुक्राचार्य गायकवाड असतील. सायमन मार्टिन, तुकाराम धांडे, अशोक लोटणकर विष्णू सुरासे, रमेश रावळकर, सुभाष कवडे, माधव पवार, आबिद शेख, राज मेहेर, भीमराव गणवीर, अंजली मराठे, गणेश भाकरे, रामनाथ म्हात्रे, दमयंती भोईर आदी ३४ कवी सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे सूत्रसंचालन प्रशांत वैद्य करतील. सकाळी ११ वाजता ‘प्रतिभायन’ हा कार्यक्रम होईल. त्यात मेधा पाटकर, अच्युत गोडबोले, रामदास भटकळ सहभागी होतील. मालविका मराठे, वंदना बोकील-कुलकर्णी समन्वयक असतील. दुपारी १.३० वाजता ‘विचारजागर’ यात सत्यपाल महाराज चिंचोळकर यांचे आख्यान होईल. त्याचे सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे करतील. दुपारी २.३० वाजता ज्येष्ठ रंगकर्मी कांचन व कमलाकर सोनटक्के यांची मुलाखत होईल. मुलाखतकार अजेय गंपावार, डॉ. सतीश साळुंके असतील.
सावित्रीबाई कलामंदिरात ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ यावर परिसंवाद होईल. त्यात डॉ. आनंद पाटील, डॉ. शैलेंद्र लेंडे, प्रा. गंगाधर पाटील, राहुल कोसंबी, पी. विठ्ठल, सीमा भिसे सहभागी होतील. अध्यक्षस्थानी डॉ. हरिश्चंद्र थोरात असतील. त्यांचे सूत्रसंचालन नितीन रिंटे करतील. दुपारी २ वाजता ‘विविध साहित्य प्रवाहांची सध्यस्थिती’ यावर परिसंवाद होईल. त्यात डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. लक्ष्मण टोपले, प्रा. प्रदीप पाटील, डॉ. जुल्फी शेख, मीना गोखले सहभागी होतील. डॉ. उल्हास कोल्हटकर अध्यक्ष असतील, तर नितीन आरेकर सूत्रसंचालन करतील. सायंकाळी ५ वाजता बोलीतील कथा-कथाकथन होईल. यात सुनील गायकवाड (अहिराणी), डॉ. सुमिता कोंडबत्तुनवार (झाडी बोली), राम निकम (मराठवाडी), बाबा परीट (कोल्हापुरी), भास्कर बढे (मिश्र बोली), प्रसाद कांबळी (मालवणी), संजीवन म्हात्रे (आगरी), विलास सिंदगीकर (मांगी) सहभागी होतील. अरूण म्हात्रे सूत्रसंचालन करतील.
डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात ‘आम्हीच मराठीचे मारेकरी’ यावर परिसंवाद होईल. त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर रसाळ असतील. त्यात ज्ञानेश महाराव, अॅड. शांताराम दातार, डॉ. रमेश जाधव, डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. दीपक पवार, प्रा. आनंद मेणसे, कृष्णाजी कुळकर्णी, श्रीनिवास ठाणेदार सहभागी होतील. सूत्रसंचालन विजय कदम करतील.
शं. ना. नवरे सभामंडपात सायंकाळी ५ वाजता खुले अधिवेशन आणि समारोप होईल. त्याला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे उपस्थित राहतील. यावेळी अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे असतील. मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडतील.
५ फेबु्रवारी : शं. ना. नवरे सभामंडपात सकाळी ९.३० वाजता दुसरे कवीसंमेलन पार पडेल. त्यात सायमन मार्टिन, तुकाराम धांडे, अशोक लोटणकर विष्णू सुरासे, रमेश रावळकर, सुभाष कवडे आदी ३४ कवी सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे सूत्रसंचालन प्रशांत वैद्य करतील. सकाळी ११ वाजता ‘प्रतिभायन’ हा कार्यक्रम होईल. त्यात मेधा पाटकर, अच्युत गोडबोले, रामदास भटकळ सहभागी होतील. मालविका मराठे, वंदना बोकील-कुलकर्णी समन्वयक असतील. दुपारी १.३० वाजता ‘विचारजागर’ यात सत्यपाल महाराज चिंचोळकर यांचे आख्यान होईल. त्याचे सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे करतील. दुपारी २.३० वाजता ज्येष्ठ रंगकर्मी कांचन व कमलाकर सोनटक्के यांची मुलाखत होईल.
सावित्रीबाई कलामंदिरात ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादात डॉ. आनंद पाटील, डॉ. शैलेंद्र लेंडे, प्रा. गंगाधर पाटील, राहुल कोसंबी, पी. विठ्ठल, सीमा भिसे सहभागी होतील. अध्यक्षस्थानी डॉ. हरिश्चंद्र थोरात असतील. त्यांचे सूत्रसंचालन नितीन रिंटे करतील. दुपारी २ वाजता ‘विविध साहित्य प्रवाहांची सध्यस्थिती’ यावर परिसंवादात डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. लक्ष्मण टोपले, प्रा. प्रदीप पाटील, डॉ. जुल्फी शेख, मीना गोखले सहभागी होतील. डॉ. उल्हास कोल्हटकर अध्यक्ष असतील, तर नितीन आरेकर सूत्रसंचालन करतील.
शं. ना. नवरे सभामंडपात सायंकाळी ५ वाजता खुले अधिवेशन आणि समारोप होईल. त्याला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे उपस्थित राहतील. यावेळी अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे असतील. मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडतील.