अकरावी आॅनलाइन नोंदणीसाठी शाळांमध्ये गर्दी
By Admin | Published: June 9, 2016 02:23 AM2016-06-09T02:23:39+5:302016-06-09T02:23:39+5:30
दहावीच्या निकालानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची लगीनघाई सुरू झाली आहे.
मुंबई : दहावीच्या निकालानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची लगीनघाई सुरू झाली आहे. शाळांसह सायबर कॅफेमध्ये अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी गर्दी करत असून बुधवारी नोंदणी अर्जांची संख्या एक लाखावर गेली आहे. तर पसंतीक्रम अर्ज भरताना नामांकित महाविद्यालये निवडण्यासाठी विद्यार्थी गेल्या वर्षीच्या कट आॅफची मदत घेत आहेत.
गेल्यावर्षीच्या कट आॅफचा अंदाज यावर्षी कितपत मदतशीर ठरेल, हे पहिल्या गुणवत्ता यादीनंतरच कळणार आहे. मात्र मुंबई परिसरातील नामांकित महाविद्यालयांची यादी काढली असता, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेची शेवटची कट आॅफ ९० टक्क्यांवर स्थिरावली होती. त्यात एसएससी बोर्डातून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांत कमालीच घट झाली आहे. याउलट सीबीएसई बोर्डातून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील नामांकित महाविद्यालयांतील मोक्याच्या जागांसाठी यंदा चांगलीच चुरस दिसणार आहे. (प्रतिनिधी)
>आॅनलाईन प्रवेशासाठी अद्याप ९ दिवसांचा अवधी शिल्लक असून बुधवारपर्यंत १ लाख ३ हजार ५६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. शिवाय ३२ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरले आहेत.
नोंदणी केलेल्या अर्जांत बुधवारपर्यंत १८ हजार ५५८ अर्ज निश्चित झाले असून ७९ हजार १२९ अर्जांनास्वीकृतीमिळाली आहे. याउलट पसंतीक्रम अर्जांमध्ये १५ हजार १४१ अर्ज निश्चितझाले आहेत.
>चांगले कॉलेज मिळावे ही सगळ््यांचीच इच्छा असते. दरवर्षी कॉलेजांचे कट आॅफ वाढतात, त्याप्रमाणे प्रवेशामधील चुरसही वाढते. यासाठीच गेल्यावर्षीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या टॉप ५ ‘कट आॅफ’ असलेल्या महाविद्यालयांबाबतची माहिती ‘लोकमत’ देत आहे.
यामधून गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या महाविद्यालयाला पसंतीक्रम दर्शवताना नक्कीच मदत होईल.