काशिद समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी
By Admin | Published: June 13, 2016 03:12 AM2016-06-13T03:12:26+5:302016-06-13T03:12:26+5:30
शेवटचा शनिवार, रविवार असल्याने पर्यटकांनी मुरुड व काशिद समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
मुरुड / नांदगाव : शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शेवटचा शनिवार, रविवार असल्याने पर्यटकांनी मुरुड व काशिद समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मुरुड तालुक्यात पाऊस सुरु झाला असून पर्यटक समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची गर्दी झाली असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होेती. समुद्र खवळलेला असल्याने काही प्रमाणात पोहण्यावर निर्बंध आल्याचे दिसून आले, तर काही हौशी पर्यटक पावसातही समुद्रात पोहण्याचा आनंद लुटत आहेत.
अचानकपणे संख्या वाढल्याने हॉटेल व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून आले. सर्व हॉटेलात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत होती. या शेवटच्या वीकेंडमध्ये विशेषत: तरुणाईची अलिबाग, नागाव, आक्षी, चौल, रेवदंडा, काशिद, मुरु ड आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. जंजिरा पर्यटक सहकारी संस्था राजपुरी यांनी जंजिरा किल्ला वाहतूक १ जूनपासून बंद केली आहे. परंतु पर्यटकांना किल्ला बघता यावा यासाठी जर वातावरण शांत असेल व लाटांचे प्रमाण कमी असतील तरच किल्ल्यावर बोट सोडत असल्याचे यावेळी सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.
पर्यटकांचे प्रमाण वाढल्याने मासळी मार्केटमध्ये याचा परिणाम दिसून आला असून मासळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या दोन दिवसात लॉजिंग व हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. (वार्ताहर)
>पावसाचा आनंद
मुरूड तालुक्यात पावसाने सुरु वात
के ली असूनपावसाचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारी पर्यटकांसह नागरिकांचीही गर्दी होत आहे. तसेच शनिवार, रविवारची सुटी आल्यानेही कोकणातील पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह सातारा, सांगली, कराड असे घाटावरु नही पर्यटक आले होते.