येवल्यात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:11 PM2020-05-05T22:11:42+5:302020-05-05T23:18:03+5:30
येवला : शहरातील मेनरोडवर मंगळवारी (दि. ५) भरलेल्या भाजीपाला बाजारात शहरवासीयांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
येवला : शहरातील मेनरोडवर मंगळवारी (दि. ५) भरलेल्या भाजीपाला बाजारात शहरवासीयांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. अनेक विक्रेते आणि खरेदीदार यांनी तोंडाला रुमाल वा मास्कही बांधला नसल्याचेही चित्र होते.
मंगळवारी येवला तालुक्याचा आठवडे बाजार भरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू असल्याने आठवडे बाजार बंद आहेत. त्यात नवीन आदेशाने भाजीपाला, फळे विक्री, किराणा व औषध दुकाने, रुग्णालये सुरू राहणार असल्याचे जाहीर झाल्याने सकाळी शहरातील मेनरोडवर भाजीपाला बाजार मोठ्या प्रमाणात भरला
होता.
शहरवासीयांनीही खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. आठवडे बाजाराप्रमाणे या बाजारात भाजीपाल्याबरोबरच तंबाखू, खाण्याची पाने, बोंबील, शिरया-झाडू, फळे, नारळ आदी विक्रीची दुकाने फुटपाथवर दुतर्फा लागली होती. याबरोबरच मेनरोडवरील किराणा दुकानेही सकाळपासूनच उघडण्यात आली होती. काही शेतकऱ्यांनी मोटरसायकल, सायकलवरून मेथी, कोथिंबीर, मिरच्या विक्रीसाठी आणलेल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी आंबे, टरबूज-खरबूज विक्र ीची वाहनेही उभी होती.
शहर पोलिसांनी तर विशेष मोहीम राबवून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत दंडात्मक कारवाईही केली आहे. मात्र, रोज उगवणारा दिवस प्रशासनाला आव्हान देणारा ठरत असून, लोकांची गर्दी
रोखणे, शिस्त लावणे यातच प्रशासन व पोलीस यंत्रणेचा वेळ व ऊर्जा वाया जात आहे.
----------------------------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन वारंवार डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला रूमाल वा मास्क वापरा, असे प्रबोधन व जागृती शहरात करत आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर तर सोशल डिस्टन्सिंग व मास्क आवश्यक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही निघालेले आहेत, मात्र अजूनही शहरवासीय गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. अनेकदा समज देऊनही लोक घराबाहेर पडायचे थांबत नाहीत.