सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ - धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:43 AM2017-11-28T05:43:27+5:302017-11-28T05:43:48+5:30
शेतकरी आणि सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भ्रमनिरास करणाºया भाजप सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर
जालना/सांगली/सातारा : शेतकरी आणि सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भ्रमनिरास करणाºया भाजप सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उठविली.
मुंडे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. शेतमालाला भाव नाही, जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आला आहे. कर्जमाफीची घोषणा केली, परंतु अद्याप एकाही शेतकºयाला त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मतदार संघात जनता हैराण झाल्याने या मोेर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.
सांगली-साताºयात आंदोलन
सांगली : केंद्र व राज्य शासनाच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी सोमवारी सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्टÑवादी कॉँगे्रसने हल्लाबोल केला. सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगाव, कडेगाव, शिराळा, विटा याठिकाणी मोर्चे काढले, तर पलूस, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांमध्ये तहसीलदारांना निवेदने देण्यात आली. साताºयात राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आ. शशीकांत शिंदे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.