क्रूझ ड्रग्स प्रकरण; आर्यन खानला एनसीबीने क्लीन चिट दिल्यानंतर, समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 11:31 PM2022-05-30T23:31:58+5:302022-05-31T00:09:02+5:30
ऑर्डरनुसार, समीन वानखेडे यांना विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय (DGARM) मुंबईहून चेन्नई डीजी, टॅक्सपेयर्स सर्व्हिस डायरेक्ट्रेट म्हणून पाठविण्यात आले आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. ऑर्डरनुसार, समीन वानखेडे यांना विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय (DGARM) मुंबईहून चेन्नई डीजी, टॅक्सपेयर्स सर्व्हिस डायरेक्ट्रेट म्हणून पाठविण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सुनावणी करत असलेल्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानला या प्रकरणात क्लीन चिट दिली होती. तेव्हापासूनच समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. समीर वानखेडे यांच्या या बदलीकडे कारवाईच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
तत्पूर्वी, कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने वाढवून दिलेला ६० दिवसांचा अवधी या महिन्यात संपला. एनसीबीकडून शुक्रवारी पहिले आरोपपत्र कोर्टात सादर करण्यात आले. त्यात आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या चार्जशीटमध्ये आर्यन खानचे नाव नाहीय. परंतू, एनसीबीचे डीजी एस एन प्रधान यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून मोठी चूक झाली असल्याचे कबूल केले आहे.
यानंतर, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सरकारने समीर वानखेडेंवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यास सांगितले आहे, अशी माहिती सुत्रांनी एका हिंदी वृत्त वाहिणीला दिली होती.