लॅण्ड, सॅण्ड, रेशन माफियांना चिरडून टाका

By Admin | Published: June 17, 2015 02:55 AM2015-06-17T02:55:10+5:302015-06-17T02:55:10+5:30

कायद्याचे राज्य स्थापन करण्यासाठी मुजोर झालेल्या लॅण्ड, सॅण्ड आणि रेशन माफियांना चिरडून टाका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Crush the land, sand, ration mafia | लॅण्ड, सॅण्ड, रेशन माफियांना चिरडून टाका

लॅण्ड, सॅण्ड, रेशन माफियांना चिरडून टाका

googlenewsNext

पुणे : कायद्याचे राज्य स्थापन करण्यासाठी मुजोर झालेल्या लॅण्ड, सॅण्ड आणि रेशन माफियांना चिरडून टाका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कोणी काही चुकीचे करत असले तर त्याच्यावर कडक कारवाई करा; सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठिशी उभे राहिल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची दोन दिवसांची महसूल परिषद पुण्यात यशदा येथे आयोजित करण्यात आली होती. फडणवीस यांच्या उपस्थितीत तिचा समारोप झाला. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. आपले कोणी काहीही करू शकत नाही, असे मुजोर माफियांना वाटते. त्यामुळे या माफियांना चिरडून काढण्यासाठी आवश्यक असलेलेल सर्व दल-बल पुरविले जाईल. कारवाई करताना काही अडचणी आल्या तर थेट माझ्याशी संपर्क करा. तुमच्या जिवाला धोका असल्यास तसा एसएमएस करा. योग्य संरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.


सेवा हमी कायदाअंमलबजावणीत कोणती सबब नको
राज्य शासन सेवा हमी कायद्यात कोणतेही प्रकारची तडजोड करणार नाही. त्यामुळे या कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी मनुष्यबळ कमी किंवा इतर काही अडचणी आहेत, अशी कोणती ही सबब खपवून घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तलाठी यांच्याकडील अनावश्यक दप्तर कमी करण्याबरोबरच काळानुसार महसूल कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी सांगतिले.

न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या पोलीसांसह सर्वच अधिकाऱ्यांना निळा दिवा वापरावा लागत आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार कारवाई करण्यासाठी एखाद्या गावात गेल्यावर अ‍ॅम्ब्युलन्स आली की काय असे लोकांना वाटते. अंबर, लाल दिव्याचा धाक निळा दिव्यात नाहीत. त्यामुळे याबाबत पुनर्विचार करणार येईल, असे ते म्हणाले.

Web Title: Crush the land, sand, ration mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.