महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेमध्ये सीसॅटचा पेपर आता केवळ पात्रता गुणांसाठीच 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 04:38 PM2022-05-04T16:38:17+5:302022-05-04T16:39:10+5:30

ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक परिक्षार्थींना होणार लाभ

CSAT paper in pre examination of Maharashtra Public Service Commission is now only for eligibility marks | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेमध्ये सीसॅटचा पेपर आता केवळ पात्रता गुणांसाठीच 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेमध्ये सीसॅटचा पेपर आता केवळ पात्रता गुणांसाठीच 

googlenewsNext

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षांमध्ये सामान्य अध्ययन पेपर क्र २ सीसॅटचा (CSAT) आता केवळ अर्हताकारी (qualifying ) गुणांसाठीच करण्याचा निर्णय  आयोगाने घेतला आहे. उमेदवारांमध्ये समानता प्रस्थापित करण्यात आली आहे.त्यासाठी किमान ३३% गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.

यास्तव शिवसेनेचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस यांनी विधानपरिषदेत विविध आयुधांद्वारे सातत्याने मागणी करुन स्पर्धा परिक्षांमध्ये सर्वांना समान संधी मिळावी यासाठी सीसॅटचे  गुण केवळ अर्हताकारी ठेवावे अशी सूचना केली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासाठी एक अभ्यास समिती नेमली होती. आयोगाने नुकत्याच जाहिर केलेल्या पत्रकामध्ये वरिल निर्णय जाहिर केला असून त्याचा ग्रामीण भागातील तसेच कला, वाणिज्य, कृषी क्षेत्रातील उमेदवारांना होणार आहे. सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मध्ये ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्र. १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

सन २०१३पासून युपीएससीच्या धर्तीवर बदललेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षेत सीसॅट चा समावेश करण्यात आला होता.युपीएससी परिक्षेत पूर्व परिक्षा पेपर क्र. २ म्हणजेच सीसॅटचे गुण फक्त पात्रतेसाठीच आहेत. पूर्व परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मेरिटच्या गुणांमध्ये सीसॅटचे गुण ग्राह्य धरले जात नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षेच्या निकालात सीसॅटचे गुण ग्राह्य धरले जात असल्याने त्याचा फायदा इंजिनियरिंग, मॅनेजमेंट इ. शाखेतील विद्यार्थ्यांना होत होता. कला, वाणिज्य, कृषि क्षेत्रातील तसेच ग्रामीण भागातील उमेदवारांना तुलनेत कमी मार्क मिळत असल्याने त्यांना मुख्य परिक्षेच्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळत नव्हता.त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता निर्माण झाली होती अशी माहिती आमदार विलास पोतनीस यांनी दिली.

Web Title: CSAT paper in pre examination of Maharashtra Public Service Commission is now only for eligibility marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.