अवजड वाहनांना अंजूरफाट्यावरून बंदी

By admin | Published: July 1, 2016 04:19 AM2016-07-01T04:19:40+5:302016-07-01T04:19:40+5:30

मुंबई, ठाणे, माणकोलीकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणाऱ्या जड व अवजड वाहनांना अंजूरफाटा येथे प्रवेश बंद केला आहे.

Cumbersome vehicles ban from Anjurpata | अवजड वाहनांना अंजूरफाट्यावरून बंदी

अवजड वाहनांना अंजूरफाट्यावरून बंदी

Next


ठाणे : रमजान ईदला सकाळी नमाज पढण्याच्या वेळी भिवंडी शहरात वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी मुंबई, ठाणे, माणकोलीकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणाऱ्या जड व अवजड वाहनांना अंजूरफाटा येथे प्रवेश बंद केला आहे.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ६ जुलै रोजी किंवा एक दिवस मागेपुढे चंद्र दर्शनादिवशी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत अमलात राहील. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांतील वाहने आदींना ही अधिसूचना लागू नसल्याचे वाहतूक विभागाने नमूद केले.
यावेळी वाहने कारिवली जकातनाका रोडने वीटभट्टीमार्गे इच्छित स्थळी जातील. मुंबई, ठाण्याकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने अंजूरफाट्याकडून भिवंडीत येणाऱ्या टीएमटी व एसटी बसेस व हलक्या वाहनांना नारपोली पोलीस स्टेशन येथे प्रवेश बंद केला आहे. या ठिकाणी प्रवासी उतरतील व तेथूनच संबंधित वाहने प्रवासी घेऊन परत जातील, तर हलकी वाहने देवजीनगर अथवा साईनाथ सोसायटी, कामतघर रोडने इच्छित स्थळी जातील. (प्रतिनिधी)

Web Title: Cumbersome vehicles ban from Anjurpata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.