नवमतदारांमध्येही उत्सुकता!

By admin | Published: October 13, 2014 10:53 PM2014-10-13T22:53:21+5:302014-10-13T22:53:21+5:30

अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवमतदार हा निर्णायक ठरल्याचे म्हटले जाते. या लोकसभेच्या निमित्ताने प्रथमच नवमतदार आणि त्याचं अस्तित्त्व यावर बोललं गेलं.

Curiosity among the newcomers! | नवमतदारांमध्येही उत्सुकता!

नवमतदारांमध्येही उत्सुकता!

Next
मुंबई : अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवमतदार हा निर्णायक ठरल्याचे म्हटले जाते. या लोकसभेच्या निमित्ताने प्रथमच नवमतदार आणि त्याचं अस्तित्त्व यावर बोललं गेलं. सोशल मीडियावर केलेल्या प्रचार आणि प्रसाराचाच हा परिणाम दिसून आला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही हे नवमतदार आपल्या मतदानाची ताकद दाखवून देणार का हे पाहणो, औत्सुक्याचे ठरेल.
 
लोकसभा निवडणुकीत तरुणाईला बदल हवा होता आणि तो निकालाअंती मिळालाही. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत तरुणाईला आपलेसे करण्याचा प्रयत्न सर्वच राज्यकत्र्याकडून होताना दिसतोय. त्यात युती आणि आघाडीच्या ‘घटस्फोटा’नंतर राज्यातील समीकरण वेगाने बदलली. त्यामुळे ‘पंचरंगी’ लढतीमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नवे राजकीय वादळ आल्याचेही म्हटले जाते. प्रचाराच्या रणधुमाळीतील आरोप-प्रत्यारोप असो, जागावाटपाचा वाद असो वा मुख्यमंत्रिपदाची लालसा या सगळ्या मुद्दय़ांबाबत नवमतदारांना नेमके काय वाटते हेच जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय..
 
मुख्यमंत्री कोण?
पंचरंगी लढतीमुळे यंदा ‘मुख्यमंत्री’ पदाच्या स्पर्धेत असणा:यांनी प्रचारादरम्यान चांगलाच जोर लावला. यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत राहिली. याबाबत, तरुणांना विचारले असता मुख्यमंत्रिपदासाठी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची चर्चा असल्याचे दिसून आले. मात्र, यंदा या पदाच्या दावेदारांबाबत तरुणाई फारशी खूश नसल्याचे दिसून आले.
 
पक्ष महत्त्वाचा की उमेदवार?
लोकसभा निवडणुकीच्या लढतीत साठीच्या नरेंद्र मोदींनी बाजी मारत तरुण पिढीतल्या राहुल गांधींवर मात केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणाईसाठी ‘आयडॉल’ ठरले. पण आता विधानसभा निवडणुकीत नवमतदारांची पंचाईत झाली आहे. युती आणि आघाडी तुटल्यामुळे प्रमुख पाचही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे हे नवमतदार अधिकच संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आता ‘पक्षनिष्ठा’ आणि ‘उमेदवाराचा चेहरा’ या दोहोंमधील गोंधळ नवमतदारांसाठी गुंतागुंतीचा ठरत आहे.
 
वाद जागावाटपाचा 
केवळ जागावाटपाच्या ‘ताणाताणी’मुळे युती आणि आघाडीचा संसार मोडला. ही समीकरणं आधीपासून ठरलेली असतानाही या राज्यकत्र्यानी दीड-दोन आठवडे मतदारांची अवस्था ‘त्रिशंकू’प्रमाणो केली. या जागावाटपाच्या तिढय़ाबद्दल तरुणाईच्या मनात रोष असून आता वेगळे झाल्यानंतरही विकासाच्या मुद्दय़ावर न बोलता हे राज्यकर्ते केवळ एकमेकांची उणीदुणी काढतायत, असे तरुणाईचे म्हणणो आहे.
 
नुसतेच ‘आरोप-प्रत्यारोप’
प्रचाराने वेग धरल्यानंतर राज्यभरात प्रचाराचा ‘बोलबाला’ होण्याऐवजी राज्यकत्र्यानी एकमेकावंर घेतलेल्या ‘तोंडसुखा’ची अधिकच चर्चा झाली. मग त्यात ब्ल्यू प्रिंट, व्हिजन डॉक्युमेंट, दृष्टिपत्र, जाहीरनामा या वेगवेगळ्या शब्दांची ‘अदलाबदल’ करत सगळ्यांनीच विकासाचा आराखडा मांडला. मात्र त्यानंतर विकासाच्या मुद्दय़ाला बगल देत केवळ एकमेकांची ‘अब्रू’ दावणीला बांधण्याकडेच या राज्यकत्र्याचा कल दिसून आला. या आरोप-प्रत्यारोपांबद्दल तरुणाईच्या मनात प्रचंड चीड असून यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करणारे राज्यकर्ते असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी मांडली.
 
निवडणुकीपूर्वीच गणितं बिघडलेल्या राजकीय पक्षांनी आधीच रंग दाखविले आहेत. त्यामुळे या पंचरंगी लढतीत नेमका कुणावर विश्वास ठेवावा, याबद्दल अजूनही संभ्रम आहेच. पण एकूणच सर्व मुद्दय़ांचा विचार करून तरुण पिढीचा विचार करणा:या उमेदवारालाच मत देणार आहे.
- मुकुलिना कोलते, 
नवमतदार
 
सगळेच पक्ष एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असल्यामुळे गोंधळ वाढला आहे. मात्र यातही सोशल मीडियाच्या जाहिरातींना भुरळून न जाता योग्य पक्ष आणि उमेदवारालाच मत देण्याचा निर्धार केला आहे.
- अक्षया घाडी, 
नवमतदार 
 
राज्यातील पाचही प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे तरुणाई गोंधळली आहे. मात्र हल्ली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईने मतदान करून जबाबदारी बजावली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत योग्य उमेदवारालाच आम्ही मतदान करू.
- अदिश्री सहस्रबुद्धे, 
नवमतदार 
 

 

Web Title: Curiosity among the newcomers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.