समुद्रात ‘करंट’; मासेमारी ठप्प

By admin | Published: December 25, 2015 10:59 PM2015-12-25T22:59:14+5:302015-12-25T23:52:44+5:30

हवामान बदलाचा परिणाम : नौका स्थिरावल्या

'Current' at Sea; Fishing jam | समुद्रात ‘करंट’; मासेमारी ठप्प

समुद्रात ‘करंट’; मासेमारी ठप्प

Next

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही दिवस वाऱ्याचा जोर वाढल्याने नौकांनी सुरक्षित बंदरांचा आश्रय घेतला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला असून, मासेमारी ठप्प झाली आहे. मालवणसह सिंधुदुर्गात पर्यटन हंगाम तेजीत असताना माशांची आवक घटल्याने मिळालेल्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.
सुरमई, पापलेट, चिंगुळ, आदी बड्या किमतीची व पर्यटकांची मोठी मागणी असलेल्या मासळीला गेल्या काही महिन्यातील सर्वाधिक दर मिळाला आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने काही हॉटेल व्यावसायिकांकडून गोवा येथूनही मासळी आयात करण्यात आली आहे. हवामानातील हा बदल दोन ते तीन दिवस असाच राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. गेले आठ दिवस समुद्रात उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या (उपरच्या) वाऱ्याने जोर धरला आहे. समुद्री पाण्याचा प्रवाह दक्षिण दिशेने जोरदार वाहत आहे. याला मासेमारी भाषेत पाण्याला ‘करंट’ मारणे असे म्हणतात. या हवामानातील बदलामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही नौका मालवण, सर्जेकोट, देवगड व अन्य बंदरात स्थिरावल्या आहेत. वाऱ्याचा परिणाम मासेमारीवरही झाला आहे. (प्रतिनिधी)

गोव्यातून मासळी आयात
पर्यटकांची मोठी मागणी असलेली पापलेट, सुरमई, चिंगुळ, आदी मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. ३०० ते ४०० रुपये किलोच्या दराने मिळणारी सुरमई ८०० ते ९०० रुपये बाजारभावाने मिळत आहे. बाजारात गोवा मार्केट येथून मासळी आयात करण्याची वेळ आली आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेता काही व्यावसायिक गोवा येथील मासळी देत आहेत. समुद्रातील हा बदल आणखी काही दिवस असाच राहील.


चार्जींगला लावून ठेवण्यात आलेली तिकीट यंत्रे जळून खाक झाली.
आगीचे कारण गुलदस्त्यात
शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबत एस्. टी.चे अधिकारी चौकशी करीत आहेत.


ड्युटीवर असूनही गैरहजेरी
वाहक, चालक नेहमीप्रमाणे सकाळपासून ड्युटीवर हजर होते. मात्र तिकीट यंत्रे बाद झाल्यामुळे व तिकीट ट्रे उपलब्ध नसल्यामुळे वाहक, चालकांना बसून रहावे लागले. संगणकावर तिकीट ट्रेचे अपडेट घेऊन तिकीट ट्रे वाहकांच्या ताब्यात देण्यात येत होते. परंतु फेऱ्या जाऊ न शकलेल्या चालक, वाहकांची हजेरी प्रशासनाकडून लावून घेण्यात असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कर्मचाऱ्यांची चुकी नसताना अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटत होत्या. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे रत्नागिरी आगार सचिव बी. ए. विश्वासराव यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन हजेरी लावण्याची विनंती केली आहे.

Web Title: 'Current' at Sea; Fishing jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.