देशात सध्या भगव्या भांडवलशाहीचा विषारी प्रयोग

By admin | Published: February 29, 2016 04:26 AM2016-02-29T04:26:50+5:302016-02-29T04:26:50+5:30

देशात सध्या भगव्या भांडवलीशाहीचा विषारी प्रयोग सुरू आहे, असा गंभीर आरोप राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी रविवारी केला.

Currently the poisonous use of saffron capitalism in the country | देशात सध्या भगव्या भांडवलशाहीचा विषारी प्रयोग

देशात सध्या भगव्या भांडवलशाहीचा विषारी प्रयोग

Next

कोल्हापूर : देशात सध्या भगव्या भांडवलीशाहीचा विषारी प्रयोग सुरू आहे, असा गंभीर आरोप राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी रविवारी केला. अशा परिस्थितीमध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्र सेवा दलात कडव्या सैनिकांची फौज वाढविण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले.
सदर बझारमधील कोरगावकर हायस्कूलमध्ये आयोजित राष्ट्र सेवा दलाच्या अमृतमहोत्सवी मेळाव्यात ‘धर्मांधतेचे धर्मनिरपेक्ष लोकशाहीला आव्हान’ या विषयावरील परिसंवादात वैद्य बोलत होते. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा, किसान संघर्ष समितीचे नेते डॉ. सुनीलम यांची प्रमुख उपस्थिती होती.
रजिया पटेल म्हणाल्या, धर्मांधताच केवळ धर्मनिरपेक्षतेला आव्हान देत नाही. महाश्रीमंत, समतावादी विचार न पटलेले, राज्यघटना मान्य नसलेले असेही लोक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर घाला घालीत आहेत. पन्नालाल सुराणा म्हणाले, ‘सनातन’ची विचारधारा हिंसेला प्रोत्साहन देणारी आहेत. ‘आपला विचार न मानणाऱ्यांना संपवा,’ असे ‘सनातन’च्या गुरूंनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. त्याच विचारधारेतून डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कलबुर्गी यांची हत्या झाली आहे. या वेळी प्राचार्य टी. एस. पाटील यांचे भाषण झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Currently the poisonous use of saffron capitalism in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.