सैनिकावरील हल्ला प्रकरणातील आरोपी एटीएसच्या ताब्यात

By admin | Published: October 13, 2015 11:08 PM2015-10-13T23:08:15+5:302015-10-13T23:08:15+5:30

पुसद पोलिसांनी केली अटक, आरोपीस ठेवले स्वतंत्र कोठडीत.

In the custody of ATS, accused in the case of the soldier | सैनिकावरील हल्ला प्रकरणातील आरोपी एटीएसच्या ताब्यात

सैनिकावरील हल्ला प्रकरणातील आरोपी एटीएसच्या ताब्यात

Next

अकोला : पुसद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका एसआरपीएफ जवानावर प्राणघातक हल्ला करणार्‍या आरोपीस पुसद पोलिसांनी अटक करून अकोला दहशतवादविरोधी पथकाच्या स्वाधीन केले आहे. या आरोपीस दहशतवादविरोधी पथकाने आधी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते; मात्र काही वेळातच त्याची कोतवाली पोलीस ठाण्यातील स्वतंत्र कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याचा इतर आरोपींशी संपर्क होऊ नये, याची खबरदारी एटीएसकडून घेतली जात आहे. पुसद येथील एका एसआरपीएफ जवानावर अ. रज्जाक नामक युवकाने धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात जवान गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी पुसद पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३३२, ३३३, ३0७, ३५३ व १८६ अनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर या आरोपीस पुढील तपासासाठी अकोला दहशतवादविरोधी पथकाच्या स्वाधीन करण्यात आले. या पथकाने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एटीएसने या आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले; मात्र सदर आरोपी इतरांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी त्याला तातडीने सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये हलविण्यात आले. या आरोपीसाठी दहशतवादविरोधी पथकाने दोन वेळा लॉकअप बदलल्याने व त्याच्यासाठी स्वतंत्र लॉकअप ठेवल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दरम्यान, दहशतवादविरोधी पथक सदर आरोपीस घेऊन मंगळवारी पुसदला रवाना झाल्याची माहिती आहे.

Web Title: In the custody of ATS, accused in the case of the soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.