पानसरेंविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: February 25, 2015 11:45 AM2015-02-25T11:45:53+5:302015-02-25T11:48:34+5:30
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यानंतर आता खेडेकर असा धमकी देणारा मजकूर फेसबुकवर टाकणा-या अमोल पाटील या तरुणाला पोलिसांनी औरंगाबादमधून ताब्यात घेतले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २५ - नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यानंतर आता खेडेकर असा धमकी देणारा मजकूर फेसबुकवर टाकणा-या अमोल पाटील या तरुणाला पोलिसांनी औरंगाबादमधून ताब्यात घेतले आहे. अमोल हा हिंदू राष्ट्र सेनेशी संबंधीत असल्याचे समजते.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर फेसबुकवर अमोल पाटील नामक तरुणाने आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. 'नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर गोविंद पानसरेही बाद, आता खेडेकरांचा नंबर, खुब जमेगा रंग जब मिल बैठेगे तीन यार' अशी पोस्ट अमोलने फेसबुकवर टाकली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी अमोलला औरंगाबादमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशीसाठी अमोलला कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्त केले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. अमोलच्या पोस्टला लाईक व शेअर करणा-यांवरही कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली आहे.