रेल्वेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कस्टमर सर्व्हिस पोर्टल-सुरेश प्रभू
By admin | Published: January 12, 2015 03:11 AM2015-01-12T03:11:55+5:302015-01-12T03:11:55+5:30
रेल्वेमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशामध्ये ‘कस्टमर सर्व्हिस पोर्टल’ सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देवगडवासीयांतर्फे झालेल्या नागरी सत्कारप्रसंगी दिली.
जामसंडे (सिंधुदुर्ग) : रेल्वेमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशामध्ये ‘कस्टमर सर्व्हिस पोर्टल’ सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देवगडवासीयांतर्फे झालेल्या नागरी सत्कारप्रसंगी दिली.
सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या रेल्वेमधील समस्या सोडविण्यासाठी ई-पोर्टलबरोबरच ‘नॅशनल हेल्पलाईन’ सुरू करण्यात येईल. इंटरनेट वापरता न येणाऱ्या व्यक्तींना हेल्पलाईनवरून तक्रारी मांडता येतील. संबंधित तक्रारीची तातडीने दखल घेतली जाईल. तक्रारीनंतर काय कारवाई करण्यात आली, त्याची माहिती संबंधितास दिली जाईल. रेल्वेत ६ ते ८ लाख कोटींची गुंतवणूक झाल्यास विकास कामांचा वेग वाढेल, असेही ते म्हणाले. देवगडच्या हापूस आंब्याची कॉपी करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. मात्र, या आंब्याची चव दुसरीकडे कोठेही नाही. फळे किंवा भाज्या खराब होऊन वाया जाऊ नये, यासाठी स्वतंत्र मंत्रालयही स्थापन करण्यात आले आहे. या मंत्रालयामार्फत आंब्याला फायदा करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)