आता महावितरण येणार ग्राहकांच्या दारी
By admin | Published: May 26, 2015 02:29 AM2015-05-26T02:29:22+5:302015-05-26T02:29:22+5:30
गावागावांत जाऊन करणार तक्रारींचा निपटारा.
अकोला: विद्युत जोडणी घेणे, नादुरुस्त फिडरपासून त्रस्त असणे, तसेच शहर व ग्रामीण भागात येणार्या विजेच्या समस्या सोडविण्याकरिता ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नसून, महावितरणच ग्राहकांच्या दारी येणार आहे. महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधी गावागावांत जाऊन ग्राहकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचा निपटारा करणार आहेत. ग्राहकांना सुविधा मिळावी व त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता महावितरणच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत महावितरण व राजकीय पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात मुख्य अभियंता यांनी सदर नियोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील रोहित्रांमध्ये असलेल्या विविध समस्या, नवीन विद्युत जोडण्या, सिंगल फेज, थ्री फेज विद्युत पुरवठा गावांमध्ये सुरू करणे, शेतकर्यांपयर्ंत विद्युत पुरवठा पुरविणे, शेतात कृषिपं पांना वीज जोडणी देणे आदी कामे करण्यात येणार आहेत. या पथकामध्ये महावितरणच्या विभागीय मंडळाचा मुख्य अभियंता, विभागीय ग्रामीण कार्यकारी अभियं ता, जिल्हा कार्यालय कार्यकारी अभियंता, तालुका उपकार्यकारी अभियंता, लेखाधिकारी व तालुक्यातील सर्व कनिष्ठ अभियंता तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.