गैरप्रकारांविरोधात डॉक्टरांचा "कट"

By admin | Published: July 1, 2017 01:22 PM2017-07-01T13:22:33+5:302017-07-01T13:22:33+5:30

ख्यातनाम डॉक्टरांनी एकत्र येऊन वैद्यक व्यवसायाला काळिमा फासणाऱ्या कट प्रॅक्टिसविरोधात आवाज उठवला आहे.

"Cut" of doctors against malpractices | गैरप्रकारांविरोधात डॉक्टरांचा "कट"

गैरप्रकारांविरोधात डॉक्टरांचा "कट"

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.1- कट किंवा सीयूटी नावाने ओळखले जाणारे वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार सहसा चर्चेत येत नाहीत. कट प्रॅक्टीसमुळे आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावे लागलेले रुग्णही याबाबत हताश होण्यापलिकडे व्यक्त होत नाहीत. त्यामुळे या विषयावर डॉक्टरांनी तोंड उघडणे दुर्मिळच. पण 28 जून रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये अनेक ख्यातनाम डॉक्टरांनी एकत्र येऊन वैद्यक व्यवसायाला काळिमा फासणाऱ्या या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. एशियन हार्ट इन्स्टीट्यूट येथे झालेल्या एका बैठक आणि पत्रकार परिषदेमध्ये ख्यातनाम डॉक्टरांनी एकत्र येऊन कट प्रॅक्टीसविरोधात मते व्यक्त केली आणि असे गैरप्रकार रोखण्यासाठी कायदा करण्याची विनंतीही सरकारला केली.  आज साजऱ्या होत असलेल्या जागतीक डॉक्टर्स डे च्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व आहे.
या बैठकीमध्ये एशियन हार्ट इन्स्टीट्यूटचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय डिसिल्वा, हेल्थस्प्रिगचे सहसंस्थापक डॉ. गौतम सेन, आयएमए भाईंदरचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत देसाई, डॉ. रमाकांत पांडा, पद्मभूषण डॉ. के. श्रीनाथ रेड्डी, डॉ. भूपतीराजू सोमराजू ,पद्मभूषण डॉ. समिरण नंदी, पद्मभूषण डॉ. देवी शेट्टी, पद्मश्री डॉ. जी.एन. राव, पद्मश्री डॉ. सोमा राजू, डॉ. हिंमतराव बावस्कर अशा ख्यातनाम डॉक्टरांनी सहभाग घेतला. यावेळेस बोलताना डॉ. डिसिल्वा म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्राच्या परिघावर असणारी ही कट प्रॅक्टीस आता व्यवसायाच्या अगदी केंद्रस्थानी येऊन पोहोचली आहे. तरुण डॉक्टरांनाही बहुतांशवेळा त्यांच्या इच्छेविरोधात यामध्ये ओढले जाते.
डॉ. समिरण नंदी यांनीही याबाबत बोलताना ऑक्सफर्ड प्रेस द्वारे प्रकाशित होत असलेल्या हिलर्स ऑर प्रिडेटर्स पुस्तकाचा उल्लेख केला. कट प्रॅक्टीस केवळ भारतापुरतीच मर्यादित राहिली नसून ती सगळीकडेच पसरलेली आहे. इतर देशांमध्ये कट प्रॅक्टीस रोखण्यासाठी कडक कायदे आहेत मात्र भारतात तसा कायदा अद्याप नसल्याची खंत नंदी यांनी व्यक्त केली. डॉ. जी.एन. राव यांनी कट प्रॅक्टीसही वैद्यकीय व्यवसायातील एक मूलभूत प्रश्न असल्याचे सांगून हे प्रकार रोखण्यासाठी उपाय योजले जाऊ शकतात असे सांगितले. यातील दीर्घकालीन उपाययोजना शिक्षणापासून सुरु करता येतील. वैद्यकीय शिक्षणक्रमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या गैरप्रकाराविरोधात उभे राहण्यास शिकवले जावे. मध्यमकालीन उपाययोजनांमध्ये डॉक्टरांनी देशभरात प्रवास करुन तरुण डॉक्टरांना आपल्या क्षेत्राची तत्त्वे पटवून दिली पाहिजेत आणि गैरप्रकाराविरोधात उभे राहण्यास सांगितले पाहिजे. खासगी डॉक्टरांच्या तपासणीनंतर सरकारी डॉक्टरांकडून सेकंड ओपिनियन घेतले पाहिजे असा कायदा सरकारने तयार करण्यापेक्षा आपणच योग्य तत्त्वांचे पालन केले पाहिजे. त्याचप्रमाणे रुग्णालयांच्या व्यवस्थापनांशी बोलून कटपासून दूर राहण्याची विनंती केली पाहिजे आणि सरकारनेही अशी प्रॅक्टिस करणाऱ्यांना कायद्याद्वारे रोखले पाहिजे.
विंचूदंशावर संशोधन करणारे ख्यातनाम डॉक्टर आणि लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरचे मानकरी डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी यावेळेस बोलताना स्वतःचाच अनुभव सांगितला. 2006 पासून आपण याविरोधात लढत असल्याचे त्यांनी सांगितले. पेशंट रेफर केल्याबद्दल मला 500 रुपये देऊ करण्यात आले होते. मी त्याची तक्रार केली पण पुढे काहीच झाले नाही. त्यानंतर एका रेडिओलॉजिस्टनेही मला 1200 रुपयांचा धनादेश दिला. त्याची मी महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलकडे तक्रा केली, त्यांनी त्यावर मेमो आणि स्टे ऑर्डर दिली. नैतिकता आणि व्यवसायातील तत्त्वांचे महत्त्व शाळेपासूनच मुलांना समजावले पाहिजे., असे ते म्हणाले.

Web Title: "Cut" of doctors against malpractices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.