वैद्यकीय प्रवेशासाठी कट ऑफ वाढणार; राज्यात ८१ हजार १७१ विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:09 AM2019-06-06T03:09:05+5:302019-06-06T06:32:51+5:30
नीटमध्ये ७०१-१३४ गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ लाख ४ हजार ३३५ आहे. त्यातही एक समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५२ ते ५५ आहे.
पुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे यंदा नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांसह बहुतांश सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचा खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांच्या कट ऑफ मध्ये सुमारे २० गुणांनी तर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांचा कट ऑफ सुमारे १२ गुणांनी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी यंदा वैद्यकीय प्रवेशासाठी चांगलीच रस्सीखेच दिसून येईल.
नीटमध्ये ७०१-१३४ गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ लाख ४ हजार ३३५ आहे. त्यातही एक समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५२ ते ५५ आहे. नीट परीक्षेत ६९५ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना ९९.९९ पर्संटाईल मिळाले आहेत. महाराष्ट्रातून नीट परीक्षेस प्रविष्ठ होणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून यंदा राज्यातील ८१ हजार १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सुमारे ५६ हजार जागा आहेत. तर महाराष्ट्रात सुमारे २ हजार ८०० जागा आहेत. त्यातील १५ टक्के कोटा देशभरातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. परंतु, बारामती येथे नुकत्याच सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे मेडिकलच्या जागा शंभरने वाढल्या आहेत. पुणे - मुंबई येथील मेडिकल कॉलेजचा कट ऑफ ५५० ते ५७५ पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांकडून मुंबईतील जी.एस.मेडिकल कॉलेज, लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, जे. जे. कॉलेज, नायर कॉलेज, बाळासाहेब ठाकरे कॉलेजला सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.