औरंगाबादमध्ये उद्योगांच्या पाण्यात कपात

By Admin | Published: April 13, 2016 02:03 AM2016-04-13T02:03:25+5:302016-04-13T02:03:25+5:30

बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांवर भर दुष्काळात २४ तास पाण्याची खैरात करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) अखेर उपरती झाली आहे.

Cutting industry's water in Aurangabad | औरंगाबादमध्ये उद्योगांच्या पाण्यात कपात

औरंगाबादमध्ये उद्योगांच्या पाण्यात कपात

googlenewsNext

औरंगाबाद : बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांवर भर दुष्काळात २४ तास पाण्याची खैरात करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) अखेर उपरती झाली आहे. या उद्योगांना २४ तास मिळणाऱ्या शुद्ध पाण्यात अखेर कपात करण्यात आली असून, आता औद्योगिक वसाहतींना केवळ ३ ते १४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही अघोषित पाणी कपात १५ एप्रिलपासून अंमलात आणली जाणार आहे.
दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांना १६ रुपयांत एक हजार लिटर या दराने शुद्ध पाण्याचा २४ तास पुरवठा केला जात होता. मद्यनिर्मिती करणारे १२ उद्योग दररोज ४० लाख लिटर पाण्याचा वापर करीत होते.
‘लोकमत’ने याबाबत आवाज उठविला. त्यानंतर आ. अब्दुल सत्तार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर उद्योगांची पाणी कपात अटळ मानली जात होती; परंतु पाणी कपातीवर ठोस निर्णय घेण्याऐवजी अप्रत्यक्षपणे ती लागू करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राला २४ तास होणारा शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय ‘एमआयडीसी’ने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या जिवंत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने मृत साठ्यातून औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा केला जात आहे. मृत साठादेखील दररोज घटत आहे. औद्योगिक वसाहतींसाठी ब्रह्मगव्हाण येथील केंद्रातून पाण्याचा उपसा केला जातो. त्या ठिकाणीदेखील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या ७ एप्रिलला झालेल्या संयुक्त बैठकीत जायकवाडीतील पाण्याचे नियोजन करून काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हे नियोजन करण्यात आले आहे. ब्रह्मगव्हाण येथील योजनेतून पाणी उचलण्यासाठी द्विस्तरीय पम्पिंग योजना राबविली जात असल्याचे ‘एमआयडीसी’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

जायकवाडीतील पाण्याच्या वापराचे नियोजन ‘एमआयडीसी’ने केले आहे. औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी आता वेळा निश्चित करण्यात आल्या असून, कपात मात्र करण्यात आलेली नाही. वेळापत्रकामुळे उद्योगांना पाण्याची कमतरता भासणार नाही. -आशिष गर्दे, अध्यक्ष, सीएमआयए

Web Title: Cutting industry's water in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.