सायबर हल्ल्याचा जेएनपीटीच्या टर्मिनलवर परिणाम
By admin | Published: June 29, 2017 01:32 AM2017-06-29T01:32:32+5:302017-06-29T01:32:32+5:30
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) एका टर्मिनलचे काम सायबर हल्ल्यामुळे प्रभावित झाले आहे. जहाजबांधणी
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) एका टर्मिनलचे काम सायबर हल्ल्यामुळे प्रभावित झाले आहे. जहाजबांधणी मंत्रालयाने सांगितले की, मार्स्कस हेग कार्यालयातील मालवेअर अॅटॅकमुळे जेनपीटीतील टर्मिनलवर परिणाम झाला आहे. जेएनपीटी टर्मिनलवर होणारी मालवाहतूक अन्य दोन टर्मिनलवर स्थलांतरीत करण्याबाबत जेएनपीटीने मार्स्कस हेग समूहाला सूचित केले आहे.
सरकार लवकरच याबाबत माहिती सादर करणार आहे. समुद्री क्षेत्रात संचलन करणाऱ्या मार्स्कस हेग ग्रुपने सांगितले की, २७ जून रोजी झालेल्या पेट्या सायबर हल्ल्याचा कामकाजावर परिणाम झाला. हल्ल्याचा परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी अभ्यास करण्यात येत आहे. युरोपसह अनेक भागात मंगळवारी रात्री झालेल्या या रॅन्समवेअर सायबर हल्ल्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या बंदरावर याचा परिणाम झाला आहे. युरोपातील प्रमुख बँका आणि संस्थांना या हल्ल्याने लक्ष्य केलेले आहे. एपी मोलर मार्स्क ग्रुप जगभरातील प्रमुख समूहांपैकी एक असून १.८ मिलियन कंटेनरचे संचलन करण्याची त्यांची क्षमता आहे. जेएनपीटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेट वे टर्मिनल इंडियातील (जीटीआय) सिस्टीमवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. (वृत्तसंस्था)