गुन्हे रोखण्यासाठी उभारणार सायबर फोर्स

By admin | Published: August 16, 2016 01:39 AM2016-08-16T01:39:58+5:302016-08-16T01:39:58+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकीकडे पारदर्शी कारभार करतानाच राज्यातील जनतेची सुरक्षितता व मालमत्तेच्या रक्षणासाठी सायबर फोर्स उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र

Cyber ​​Force will set up to prevent crime | गुन्हे रोखण्यासाठी उभारणार सायबर फोर्स

गुन्हे रोखण्यासाठी उभारणार सायबर फोर्स

Next

मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकीकडे पारदर्शी कारभार करतानाच राज्यातील जनतेची सुरक्षितता व मालमत्तेच्या रक्षणासाठी सायबर फोर्स उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सायबर कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, डॉ. विजयसतबीर सिंह, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध) ब्रिजेश सिंह उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, देशाची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू आहे. इंटरनेटच्या अधिकाधिक वापरामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण व पद्धतीही वाढल्या आहेत. या गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी एक हजार पोलिसांना प्रशिक्षित करून भक्कम सायबर फोर्स तयार करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत राज्यात ४२ ठिकाणी सायबर लॅब सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सीसीटीएनएसच्या माध्यमातून राज्यातील सर्व पोलीस ठाणी एकमेकांना जोडण्यात आली आहेत. पुणे येथे आॅनलाईन तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील गुन्ह्यांचा शोध तातडीने लावण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची क्षमता वाढविण्यात येत आहे. या सायबर लॅबचा वापर खासगी बँका व इतर संस्थांना सेवा पुरविण्यासाठी करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
माहिती तंत्रज्ञानाने देश जोडला जात असताना ते तोडण्याचे काम हॅकर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेला बिघडविण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ‘सायबर लॅब’चा उपयोग होणार असल्याचे पोलीस महासंचालक माथूर यांनी सांगितले.
तर, औद्योगिक सुरक्षेसाठी सायबर हा प्रकल्प महत्वाचा असून हाय स्पीड फायबर आॅप्टिक केबल नेटवर्कने सर्व लॅब जोडण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी
दिली. (प्रतिनिधी)
राज्यात सायबर लॅबचे जाळे विणण्यात येत असून ४२ सायबर लॅब सुरू झाल्या आहेत. यापुढे दहशतवादविरोधी पथक, विशेष गुन्हे शाखा, गुन्हे शोध पथक आदी कार्यालयांमध्ये सायबर लॅब सुरु केल्या जातील. सी-डॅक या संस्थेने अवघ्या २१ दिवसांत ४२ लॅबचे काम पूर्ण केल्याचे गृहविभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Web Title: Cyber ​​Force will set up to prevent crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.