अरबी समुद्रातील चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 08:00 AM2019-06-11T08:00:00+5:302019-06-11T08:00:12+5:30

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राचे सोमवारी सकाळी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले  आहे़.

cyclone Arabian Sea in going to way of Gujarat | अरबी समुद्रातील चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

अरबी समुद्रातील चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

googlenewsNext
ठळक मुद्देकोकण, गोव्यासह गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यतालक्षद्वीप व पूर्वमध्य अरबी समुद्रात रविवारी कमी दाबाचा पट्टा तयार

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राचे सोमवारी सकाळी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले  आहे़. ते आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे़ मंगळवारी पहाटे याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे़. या चक्रीवादळाचे १२ जून रोजी तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार असून १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़. 
आग्नेय अरबी समुद्र, लगतचा लक्षद्वीप व पूर्वमध्य अरबी समुद्रात रविवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे़. त्याने आता आपली दिशा काहीशी बदलली असून तो गुजरातच्या दिशेने सरकत आहे़. सोमवारी सकाळी हा कमी दाबाचा पट्टा लक्षद्वीपच्या अमिनी दिवीपासून २५० किमी, मुंबईपासून ७६० किमी तर गुजरातच्या वेरावळपासून ९३० किमी अंतरावर होता़. मंगळवारी त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे़. यामुळे केरळ, कर्नाटकाची किनारपट्टी, गोवा, कोकणात ११ ते १४ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 
११ जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६५ ते ७५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़. त्यात वाढ होऊन १३ जूनला गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात वाऱ्याचा वेग ताशी ११० ते १२० किमी इतका असण्याची शक्यता आहे़. समुद्र खळवलेल्या असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे़.

........... 
मॉन्सूनने केरळ व्यापला
मॉन्सून सोमवारी दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, केरळचा बहुतांश भाग, तामिळनाडुचा आणखी काही भाग, आग्नेय बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात तसेच मिझोरामच्या बहुतांश आणि मणिपूरच्या काही भागात दाखल झाला आहे़. 
गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़. अकोले ११५, राहता ६२, पुणे ४७, तुळजापूर २८,वैजापूर १६, चिपळूण १५, वैभववाडी १२,  उदगीर ६, औरंगाबाद ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. 

इशारा : ११ ते १३ जून दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे़.  

Web Title: cyclone Arabian Sea in going to way of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.