Cyclone Nisarga: चक्रीवादळ अलिबागच्या किना-यावर धडकले; पुढचे २-३ तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 04:49 PM2020-06-03T16:49:59+5:302020-06-03T16:50:37+5:30
Cyclone Nisarga: मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
मुंबईः राज्यावर कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचं संकटही आलं आहे. या वादळामुळे अलिबाग, रायगड, मुंबई, ठाण्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचणार आहे. राज्य सरकारने या संकटाचा सामना करत अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दलाच्या टीम तैनात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला सतर्कतेचा आवाहन केलं आहे. रायगड जिल्ह्यातून वादळ पुढे सरकत असून, मुंबईच्या जवळून नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
निसर्ग वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडलेली आहे, बऱ्याच इमारतींवरील छपरे उडून गेली आहेत. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आत्तापर्यंत जीवितहानी कुठेही झालेली नाही. परिस्थिती या क्षणापर्यंत नियंत्रणात आहे. अलिबागजवळ समुद्र किना-यावर धडकले असून, त्याचा वेग ताशी १०० - ११० किमी आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. स्थानिक प्रशासन व NDRF मदत, बचावकार्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे. मी जिल्हाधिका-यांच्या संपर्कात असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.
#NisargaCyclone has made landfall near the Alibaug coast and it's speed is around 100-110km/hr. Heavy rains have been reported from many areas. Local administration and #NDRF have been put on alert. Citizens should follow govt orders and stay safe indoors.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 3, 2020
चक्रीवादळानं काही तासांपूर्वीच महाराष्ट्राच्या भूमीवर प्रवेश केलेला आहे. अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातून ते वादळ पुढे जात आहे. या वादळाचा ताशी वेग १०० किलोमीटरपेक्षा जास्त असून, ११० किमी असल्याचा सांगितला जातो आहे. झाडं कोसळतायत, काही छतांचे पत्रे उडतायत ही स्थिती आहे. पण प्रशासन अलर्ट आहे. एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची आताच बोललो, तेसुद्धा चांगलं काम करत आहेत. वादळ जात असताना जीवितहानी होऊ नये, याची पूर्ण काळजी आपण घेतो आहोत, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.
I am constantly in touch with the district collectors. The cyclone is likely to move from the Alibaug coast towards North Maharashtra. And while moving close to Mumbai the speed of the cyclone could increase & so the next 2-3 hours are very crucial. #CycloneNisargaUpdate
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 3, 2020
हेही वाचा
मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण
लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल
Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र
Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका