बोनकोडेत सिलिंडरचा स्फोट
By admin | Published: October 31, 2016 02:46 AM2016-10-31T02:46:56+5:302016-10-31T02:46:56+5:30
घरामध्ये लागलेल्या आगीमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी बोनकोडे गाव येथे घडली.
नवी मुंबई : घरामध्ये लागलेल्या आगीमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी बोनकोडे गाव येथे घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरामध्ये आग लागली होती. वेळीच घरातील सर्व व्यक्तींनी इमारतीबाहेर पळ काढून अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.
घरामध्ये तीन गॅस सिलेंडर असल्याची माहिती रहिवाशांकडून मिळाली. आगीमुळे सिलेंडरचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानुसार खबरदारी म्हणून तात्काळ दोन सिलेंडर घरातून बाहेर काढण्यात आले. परंतु तिसरा
स्लििंडर आगीच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट झाला.
(प्रतिनिधी)
>बोनकोडेतील सदर इमारतीचे बांधकाम जुने असल्यामुळे सिलिंडरच्या स्फोटामुळे दर्शनी भागातील भिंत कोसळली. यामुळे इमारतीचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही.