सिलिंडर स्फोटाची नुकसानभरपाई १४ लाख

By admin | Published: March 24, 2017 12:45 AM2017-03-24T00:45:43+5:302017-03-24T00:45:43+5:30

गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेल्या नुकसानीची सुमारे १४ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे.

Cylinder blast compensation compensation of 14 lakh | सिलिंडर स्फोटाची नुकसानभरपाई १४ लाख

सिलिंडर स्फोटाची नुकसानभरपाई १४ लाख

Next

यवतमाळ : गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेल्या नुकसानीची सुमारे १४ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, गॅस एजन्सी आणि इन्शुरन्स कंपनीला या आदेशाने चपराक मिळाली आहे. जिल्हा मंचच्या अध्यक्ष अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे, सदस्य डॉ. अशोक सोमवंशी यांनी हा निकाल दिला आहे.
यवतमाळमधील सदाशिव लोहकरे यांच्या घरात ३१ आॅगस्ट २०१२ रोजी सिलिंडरचा स्फोट झाला. पद्मा लोहकरे आणि तनुजा भारत लोहकरे गंभीर जखमी झाल्या. घराचेही लाखोंचे नुकसान झाले. सिलिंडर ग्राहकाचा विमा काढला जात असल्याने लोहकरे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु संबंधितांकडून टाळाटाळ सुरू झाली. अखेर त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, रजनी गॅस एजन्सी यवतमाळ, नॅशनल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला यामध्ये प्रतिवादी बनविण्यात आले. विमा मुदतीच्या कालावधीत ही घटना घडल्याचा निष्कर्ष काढून मंचाने दंड ठोठावला आहे. इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, गॅस एजन्सी आणि विमा कंपनीने घराच्या नुकसानीसाठी ५ लाख, साहित्य नुकसानीचे १ लाख ५० हजार, पद्मा लोहकरे यांना ९० हजार, तनुजा लोहकरे यांना ५५ हजार उपचार खर्चाचे तसेच शारीरिक नुकसान, मानसिक त्रास आणि तक्रार खर्चापोटी झालेला खर्च सव्याज द्यावा, असे मंचाने निकालपत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Cylinder blast compensation compensation of 14 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.