Cyrus Mistry: मर्सिडीजचा अहवाल आला! अपघातावेळी सायरस मिस्त्रींची कार होती ताशी १०० किमी वेगात; केवळ ५ सेंकद अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 07:00 PM2022-09-08T19:00:48+5:302022-09-08T19:01:45+5:30

Cyrus Mistry Accident: मर्सिडीज कंपनीचे हाँगकाँगमधील एक पथक भारतात येऊन या कारची पाहणी करणार आहे.

cyrus mistry accident death case mercedes submitted report said car was going at 100 km per hour | Cyrus Mistry: मर्सिडीजचा अहवाल आला! अपघातावेळी सायरस मिस्त्रींची कार होती ताशी १०० किमी वेगात; केवळ ५ सेंकद अन्...

Cyrus Mistry: मर्सिडीजचा अहवाल आला! अपघातावेळी सायरस मिस्त्रींची कार होती ताशी १०० किमी वेगात; केवळ ५ सेंकद अन्...

Next

Cyrus Mistry: प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे पालघरजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात निधन झाले. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर अवघ्या देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. सायरस मिस्त्री यांची अपघातग्रस्त गाडी कासा पोलिसांनी ताब्यात घेतली असून, अपघाताची यंत्रणांकडून चौकशी सुरूच आहे. गाडीच्या चीपचा डेटा जर्मनीत पाठविला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले होते. यानंतर आता यासंदर्भात मर्सिडीजचा अहवाल सादर केला आहे. 

सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबीयांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येताना झालेल्या या अपघातामध्ये मिस्त्रींसहीत त्यांच्यासोबत जहांगीर पंडोल यांचाही मृत्यू झाला. या अपघाताच्या तपासाचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज बेन्झ कारमधील डेटा चीप ही जर्मनीला पाठवण्यात आली होती. मर्सिडीजने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कार ताशी १०० किमी वेगाने धावत होती. तसंच अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक दाबवण्यात आला होता. प्रादेशिक वाहतूक कार्यालयानेही प्राथमिक तपासाचा अहवाल पोलिसांकडे सोपवला आहे.

अपघातावेळी कारचा वेग ताशी १०० किमी होता 

मर्सिडीजने अहवालात सांगितले आहे की, अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक दाबवण्यात आला होता. यावेळी कारचा वेग ताशी १०० किमी इतका होता. अनहिता यांनी ब्रेक दाबला तेव्हा कारचा वेग ताशी ८९ किमी वर पोहोचला आणि पुलाला धडक दिली. पोलिसांनी कंपनीकडे अनहित यांनी कार ताशी १०० किमी वेगात असताना ब्रेक दाबला की, त्याच्याआधीच दाबला होता अशी विचारणा केली होती. तसेच किती वेळा ब्रेक दाबवण्यात आला होता, असेही विचारण्यात आले होते. तसेच मर्सिडीज कंपनी १० सप्टेंबरला अपघातग्रस्त कार १२ सप्टेंबरला शोरुममध्ये घेऊन जाणार आहे. हाँगकाँगमधील एक पथक येऊन या कारची पाहणी करणार असून, त्यानंतर सविस्तर चौकशी अहवाल सोपवला जाणार आहे.

दरम्यान, आरटीओने आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा चार एअरबॅग उघडल्या होत्या. या चारही एअरबॅग पुढील बाजूस होत्या. यामधील एक एअरबॅग चालकाच्या डोक्यापुढे, दुसरी गुडघ्याजवळ आणि तिसरी त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूला उघडली होती. चौथी एअरबॅग चालकाच्या बाजूच्या सीटवरील पुढील बाजूला होती.
 

Web Title: cyrus mistry accident death case mercedes submitted report said car was going at 100 km per hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.