'घराला घरपण' देणाऱ्या डीएसकेंच्या राहत्या आलिशान बंगल्याचा होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 12:02 PM2018-02-21T12:02:56+5:302018-02-21T12:06:09+5:30

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडी जवळ डीएसकेंचा हा आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत...  

D S Kulkarnis bungalow auction central bank of india announced | 'घराला घरपण' देणाऱ्या डीएसकेंच्या राहत्या आलिशान बंगल्याचा होणार लिलाव

'घराला घरपण' देणाऱ्या डीएसकेंच्या राहत्या आलिशान बंगल्याचा होणार लिलाव

googlenewsNext

पुणे :  गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा अखेर लिलाव होणार आहे. 8 मार्च रोजी  सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून हा लिलाव करण्यात येणार आहे. 
पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडी जवळ डीएसकेंचा हा आलिशान बंगला आहे.  66 कोटी 39 लाख रुपये इतकी या बंगल्याची बेस प्राईस ठेवण्यात आली आहे.
दरम्यान,  डी एस कुलकर्णीं यांना आज पुन्हा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. ससून रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील 48 तास ससून रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय झाला होता. पंरतू डीएसकेंच्या वकीलांनी न्यायालयात त्यांना कोणत्या रुग्णालयातून उपचार घ्यावे याची मुभा देण्यात यावी, असा युक्तीवाद केला होता. त्यानुसार न्यायालयाने पुढील 48 तास दिनानाथ रुग्णालयात उपचार घेण्यास मुभा दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार डी.एस.कुलकर्णी 23 फेब्रुवारीपर्यंत मंगेशकर रुग्णालयात उपचार घेतील. त्यानंतर त्यांची तपासणी करून वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. त्यांनतर त्यांच्यावर कोठे उपचार करावयाचे यासंबंधी निर्णय घेतला जाईल. तत्पुर्वी आज ससूनमध्ये दाखल करण्यात आलेल्या कुलकर्णी यांची आठ डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली.
गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती.  पोलीस कोठडीत पडल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.
  

Web Title: D S Kulkarnis bungalow auction central bank of india announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.