तरुणींमध्ये ‘डी’ व्हिटॅमिनची कमतरता

By Admin | Published: November 1, 2014 01:28 AM2014-11-01T01:28:48+5:302014-11-01T01:28:48+5:30

बंदिस्त ठिकाणी जास्त वेळ काम केले जाते आणि इतर सवयींमुळे 16 ते 3क् वयोगटातील तरुणींमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता एका सर्वेक्षणामध्ये आढळून आली आहे.

D 'Vitamin deficiency in young women | तरुणींमध्ये ‘डी’ व्हिटॅमिनची कमतरता

तरुणींमध्ये ‘डी’ व्हिटॅमिनची कमतरता

googlenewsNext
मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतांश जणांचे काम हे बैठय़ा स्वरूपाचे असून यामुळे बंदिस्त ठिकाणी जास्त वेळ काम केले जाते आणि इतर सवयींमुळे 16 ते 3क् वयोगटातील तरुणींमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता एका सर्वेक्षणामध्ये आढळून आली आहे. 
तणावपूर्ण जीवन, अनेक तास बैठी कामे, बाहेरची कामे, कमी वेळ, सर्वच गोष्टींच्या अनियमित वेळा अशा जीवनशैलीमुळेच भारतीयांमध्ये डी व्हिटॅमिनच्या कमतरतेचा धोका वाढताना दिसत आहे. भारतातील विविध भागांमधून 37 हजार 1क् जणांची डी व्हिटॅमिनची तपासणी करण्यात आली होती. यापैकी 69 टक्के जणांमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता आढळून आली आहे. तर, 15 टक्के जणांमध्ये डी व्हिटॅमिनचे प्रमाण अपुरे असल्याचे आढळून आले. म्हणजेच एकूण 84 टक्के जणांमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता असल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका असल्याची बाब या सर्वेक्षणामधून पुढे आली आहे. 
16 ते 3क् वयोगटातील मुली, महिलांमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता असण्याचे प्रमाण जास्त आहे. तर 31 ते 6क् वयोगटातील पुरुषांमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता असल्याचे प्रमाण जास्त आहे. शरीराला थेट सूर्यप्रकाश मिळणो हा डी व्हिटॅमिन मिळण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. मात्र, हाच पर्याय सर्वात दुर्लक्षित आहे. डी व्हिटॅमिन कमी असल्यामुळे स्नायू दुर्बलता, सांधेदुखी होते. मात्र, काही वेळा हृदयविकारासारखे आजारदेखील संभवतात, असे एसआरएलचे डॉ. बी.आर. दास यांनी सांगितले. 
डी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मुडदूससारखा आजार होऊ शकतो. प्रसूतीनंतरही महिलांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होते. यामुळे ऑस्टिओपोरोसिस आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे या काळात महिलांनी विशेष काळजी घेणो गरजेचे आहे.  ़डी व्हिटॅमिनच्या अपुरेपणामुळे स्नायू दुखणो, थकवा जाणवणो अशा प्रकारचा त्रस जाणवतो. 
योग्य प्रमाणात शरीरामध्ये डी व्हिटॅमिन असल्यास ते शरीरातील बॅड कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. डी व्हिटॅमिन योग्य प्रमाणात असल्यास गुडघेदुखी, ऑस्टिओपोरोसिससारखे आजार उद्भवत नाहीत, असे डॉ. राव यांनी 
सांगितले. (प्रतिनिधी)
 
तणावपूर्ण जीवन, अनेक तास बैठी कामे, बाहेरची कामे, कमी वेळ, सर्वच गोष्टींच्या अनियमित वेळा अशा जीवनशैलीमुळेच भारतीयांमध्ये डी व्हिटॅमिनच्या कमतरतेचा धोका वाढताना दिसत आहे. भारतातील विविध भागांमधून 37 हजार 1क् जणांची डी व्हिटॅमिनची तपासणी करण्यात आली होती. यापैकी 69 टक्के जणांमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता आढळून आली आहे. 

 

Web Title: D 'Vitamin deficiency in young women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.