डी वॉर्ड : मेट्रो तीनचा मुद्दा ठरणार प्रभावी

By admin | Published: January 30, 2017 09:48 PM2017-01-30T21:48:05+5:302017-01-30T21:48:05+5:30

‘डी’ वॉर्डलाही प्रभाग फेररचनेमुळे मोठा फटका बसला आहे. या वॉर्डमधील प्रस्थापित नगरसेवकांचे प्रभागच आरक्षित

D Ward: Metro three issue will be effective | डी वॉर्ड : मेट्रो तीनचा मुद्दा ठरणार प्रभावी

डी वॉर्ड : मेट्रो तीनचा मुद्दा ठरणार प्रभावी

Next

मुंबई : ‘डी’ वॉर्डलाही प्रभाग फेररचनेमुळे मोठा फटका बसला आहे. या वॉर्डमधील प्रस्थापित नगरसेवकांचे प्रभागच आरक्षित झाल्याने त्यांनी आजूबाजूच्या प्रभागांकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे पक्षासाठी सच्चेपणाने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रभाग फेररचनेत या वॉर्डातील सहा प्रभागांपैकी चार प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. त्यामुळे महिला उमेदवारांना या निवडणुकीत अधिक वाव मिळणार आहे. या वॉर्डातून मेट्रो तीन जाणार असल्याने हा मुद्दादेखील निवडणुकीचा महत्त्वाचा ठरणार आहे.

फेररचनेमुळे इतर प्रभागांमध्ये होणाऱ्या घुसखोरींमुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे आव्हान विविध पक्षांपुढे निर्माण झाले आहे. पालिकेच्या ‘ए’ (कुलाबा), बी (पायधुनी), सी (चंदनवाडी), ‘डी’ (ग्रँटरोड), ‘ई’ (भायखळा) या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील प्रत्येकी एक, तर जी-दक्षिण (प्रभादेवी) मध्ये दोन प्रभाग असे एकूण सात प्रभाग कमी झाले आहेत. त्यामुळे शहरांतील नगरसेवकांची संख्या घटली आहे.

‘डी’ विभागात २०१२ सालच्या महानगरपालिका निवडणुकीत केवळ दोन प्रभाग महिला आरक्षित होते. मात्र यंदा वॉर्डमध्ये मुखत्त्वे: महिला आरक्षण असल्याने इच्छुक महिला उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही इच्छुक महिला उमेदवारांनी स्थानिक विभागात विविध पद्धतीने मतदारांचे मन जिंकण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.

गेल्या निवडणुकीत ‘डी’ वॉर्डमध्ये शिवसेनेला बहुमत प्राप्त झाले होते. त्यांचे एकूण तीन नगरसेवक होते. दोन काँग्रेस आणि दोन भाजपाचे नगरसेवक होते. आता सेनेला या ठिकाणी आपले वर्चस्व टिकवून सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

.....................................................................................

‘मेट्रो’चा मुद्दा ठरणार महत्त्वाचा

मेट्रो तीनचा मार्ग डी वॉर्डमधून जात असल्याने येथील स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हा प्रश्न असेल. त्यामुळे मतदारांचा अधिकाधिक पाठिंबा मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

..............................................................................................

प्रभाग क्रमांक २१४

आरक्षण खुला

एकूण लोकसंख्या ६०२३६

अनुसूचित जाती १८३९

अनुसूचित जमाती २१७

प्रभागाची व्याप्ती : गोवालिया टँक, जनता नगर, महालक्ष्मी मंदिर, जसलोक रुग्णालय, ताडदेव



प्रभाग क्रमांक २१५

आरक्षण खुला (महिला)

एकूण लोकसंख्या ५३०८४

अनुसूचित जाती ८९७९

अनुसूचित जमाती ३८२

प्रभागाची व्याप्ती : वेलिंग्टन स्पोर्ट्स क्लब, आर.टी.ओ, चिखलवाडी, भाटिया रुग्णालय, तुळशीवाडी, बने कंपाऊंड, तालमीकी वाडी



प्रभाग क्रमांक २१६

आरक्षण खुला (महिला)

एकूण लोकसंख्या ५९२६५

अनुसूचित जाती ३६२८

अनुसूचित जमाती ७७

प्रभागाची व्याप्ती : नवजीवन सोसायटी, बीआयटी चाळ, दलाल इस्टेट



प्रभाग क्रमांक २१७

आरक्षण इतर मागासवर्गीय

एकूण लोकसंख्या ५७३८५

अनुसूचित जाती १२३१

अनुसूचित जमाती १४९

प्रभागाची व्याप्ती : पपनसवाडी, शापुरबाग, आॅगस्ट क्रांती मैदान, गावदेवी, गिरगाव चौपाटी



प्रभाग क्रमांक २१८

आरक्षण इतर मागासवर्गीय (महिला)

एकूण लोकसंख्या ५६९९३

अनुसूचित जाती ४१९

अनुसूचित जमाती ४४७

प्रभागाची व्याप्ती : सिक्कानगर, मंगलवाडी, क्रांतीनगर, आॅपेरा हाऊस, मफतलाल जलतरण तलाव, चौपाटी, गायवाडी



प्रभाग क्रमांक २१९

आरक्षण इतर मागासवर्गीय (महिला)

एकूण लोकसंख्या ५९९०३

अनुसूचित जाती ७४८

अनुसूचित जमाती ३५७

प्रभागाची व्याप्ती : सिमलानगर, हैदराबाद इस्टेट, कमला नेहरु पार्क, राजभवन, तीनबत्ती, मलबार हिल

.......................................................................................

२०१२ साली डी वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवार

वॉर्डविजयी उमेदवार प्राप्त मते पराभूत उमेदवार प्राप्त मते

२१०नोशीर रुसी मेहता, काँग्रेस १२,०३० अनिल नागरे, मनसे२४०६

२११अरविंद दुधवडकर, सेना ९००४ प्रमोद मांद्रेकर, काँग्रेस ६७२५

२१२सरिता पाटील, भाजपा ९७७१ उज्ज्वला बने,अपक्ष८८७१

२१३अनिल सिंग, सेना ३६४८ किसन जाधव, काँग्रेस२९५३

२१४ज्योत्स्ना मेहता, भाजपा ८३५४ सुशीबेन शहा, काँग्रेस५२८२

२१५सुरेंद्र बागलकर, सेना १३,७५७ श्रीधर जगताप,मनसे ५३३४

२१६शांतीलाल दोषी, काँग्रेस ५६६० संजीव पटेल,बसपा४२०९

................................................................................................

Web Title: D Ward: Metro three issue will be effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.