एसटीत पाणी विक्रेत्याची ‘दबंगगिरी’
By Admin | Published: June 27, 2016 11:12 PM2016-06-27T23:12:59+5:302016-06-27T23:12:59+5:30
एस. टी. मध्ये खाद्यपदार्थ, पाणी बाटल्या आदींची विक्री करण्यास एस. टी. महामंडळाने निर्बंध लादले आहेत. परिणामी विके्र ते आणि चालक-वाहकांमध्ये दररोज खटके उडत
बसस्थानकात वाहकास धक्काबुक्की : दररोज वादाच्या घटना
औरंगाबाद : एस. टी. मध्ये खाद्यपदार्थ, पाणी बाटल्या आदींची विक्री करण्यास एस. टी. महामंडळाने निर्बंध लादले आहेत. परिणामी विके्र ते आणि चालक-वाहकांमध्ये दररोज खटके उडत आहेत. अशा परिस्थितीत मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी एका पाणी विक्रेत्याने ह्यदबंगगिरीह्ण करून वाहकाला धक्काबुक्की केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
बसस्थानकामधील विक्रेत्यांसाठी एस. टी.चे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. केवळ बसस्थानक परिसरातच खाद्यपदार्थांची विक्री करण्याची मुभा विक्रेत्यांना देण्यात आली आहे; परंतु तरीही बसस्थानकात एखादी बस प्रवेश करीत नाही, तोच त्यामध्ये प्रवेश करण्याची विक्रेत्यांमध्ये चढाओढ दिसून येते. अधिक नफा मिळविण्याच्या प्रयत्नात विक्रेत्यांकडून सर्रास थेट बसगाड्यांमध्ये जाऊन विक्री केली जात आहे. यातून अनेकदा प्रवाशांना धक्काबुक्कीचे प्रकार होतात. बसमध्ये विक्रेत्यांना विक्री करण्यापासून रोखावे, यासंदर्भात चालक-वाहकांना सूचना करण्यात आली आहे; परंतु विक्रेते अरेरावीची भाषा करून चालक-वाहकांबरोबर वाद घालतात.
मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास औरंगाबाद- नाशिक बसमध्ये पाणी विक्र ी करणाऱ्या विक्रेत्यास वाहकाने खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळी विक्रेत्याने असभ्य भाषेत बोलत थेट वाहकावर हात उचलला. यावेळी विक्रेत्याने वाहकास धक्काबुक्की केली. हा प्रकार समजताच अन्य कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यास बसस्थानकातील पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. अशा परिस्थितीमुळे पूर्वीप्रमाणे प्रवासी मित्र पथकाची स्थापना करण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.