डब्बा किंग दिनेश भुतडा अखेर गजाआड
By admin | Published: September 22, 2016 01:45 AM2016-09-22T01:45:59+5:302016-09-22T01:45:59+5:30
बाळापूर पोलिसांनी बुधवारी केली अटक ; २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी.
अकोला, दि. २१ - आकोटातील लोहारी रोडवरच्या आलिशान बंगल्यामधून ह्यकस्तुरी कमोडिटीजह्णच्या नावाखाली चालविण्यात येत असलेल्या समांतर शेअर मार्केट (डब्बा ट्रेडिंग)चा सुत्रधार दिनेश लक्ष्मीनारायण भुतडा यास बाळापूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यानंतर आरोपीस आकोट येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी दिनेश भुतडास २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांच्या विशेष पथकाने १ जुन रोजी आकोट येथे छापा घालुन संगणक, लॅपटॉप, मोबाइल, गुन्हयाशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज आणि अनधिकृतरीत्या चालविण्यात येत असलेल्या डब्बा ट्रेडिंगचे ह्यसौदाह्ण नावाचे सॉफ्टवेअर जप्त केले होते. येथून सात आरोपींना अटक करण्यात आली असून, नरेश व दिनेश भुतडा हे दोघे फरार झाले होते. पोलीस अधीक्षक मीणा यांनी कस्तुरी कमोडिटीजमधील डब्बा ट्रेडिंगच्या हालचालींवर पाळत ठेउन कारवाई करण्यात आली होती. या ठिकाणावरून ह्यसौदाह्ण नावाच्या अनधिकृत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोट्यवधीचा काळा पैसा गुंतविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मीणा यांच्या विशेष पथकाने दीपक महादेव राऊत, प्रशांत लाडोळे, संतोष भारसाकळे, रवींद्र भेंडारकर, गजानन मुराळे, राष्ट्रपाल भिसे, राजेश चंदन, संदीप वर्मा, उमाकांत मिश्रा या आरोपींना अटक केली होती तर दिनेश भुतडा फरार झाला होता. त्यानंतर दिनेश भुतडा याने अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने भुतडा याला दिलासा न देता पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतर दिनेश भुतडा याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत दिनेश भुतडा याने २0 सप्टेंबरपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले. त्यानंतर भुतडाने अटकेपासून बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र या प्रकरणाचे तपास अधिकारी सुशील नायक यांनी आरोपी दिनेश भुतडा यास बुधवारी अटक केली. त्यानंतर आकोट येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दिनेश भुतडास अटक झाल्याने या प्रकरणातील कोट्टयवधी रुपयांचे अवैध व्यवहार आता उघड होण्याची शक्यता आहे.