डबेवाले चालले वारीला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2016 06:17 PM2016-07-10T18:17:05+5:302016-07-10T18:17:05+5:30
मुंबईत दिनांक १५ व दिनांक १६ (शुक्रवार,शनिवार) या दोन दिवस जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवली जाणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. १० :
पुढें गेले हरिचे दास।
त्यांची आस आम्हांसी॥
त्याची मार्गी आम्हीं जाऊं।
वाचे गाऊं विठ्ठला॥
या अभंगा प्रमाणे समस्त वारकरी दिंड्या घेऊन पंढरपुरा कडे रवाना झालेले आहेत व त्या मागोमाग मुंबईचे डबेवाले ही आषाढी एकादशीला विठठल भेटीला पंढरपुरला जाणार आहेत.
या मुळे मुंबईत दिनांक १५ व दिनांक १६ (शुक्रवार,शनिवार) या दोन दिवस जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवली जाणार आहे.
बहुतांश डबेवाले हे माळकरी व वारकरी आहेत पांडूरंगाचे भक्त आहेत त्यांना आषाढी एकादशीला पंढरपुरला जायचे असल्या मुळे मुंबई जेवण डबे वहातुक मंडळाने दोन दिवसाची रजा जाहीर केली आहे.