दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी मोकाट का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 06:44 AM2018-06-29T06:44:21+5:302018-06-29T06:44:38+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास समाधानकारक नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी सीबीआय व सीआयडीला फैलावर घेतले.
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास समाधानकारक नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी सीबीआय व सीआयडीला फैलावर घेतले. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला महाराष्ट्रात अटक होते, मग दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकºयांना अटक करण्यात अपयश का, असा संतप्त सवाल करीत न्यायालयाने सीबीआय सहसंचालक व राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना समन्स बजावले.
सीबीआय व सीआयडीने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे तपास अहवाल सादर केला. मात्र, तो असमाधानकारक असल्याने न्यायालयाने तपास यंत्रणांना धारेवर धरले. गौरी लंकेश यांचा मारेकरी परशुराम वाघमारे याला कर्नाटक एसआयटीने महाराष्ट्रातून अटक केली. मग दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकºयांना अटक
करण्यास सीबीआय व सीआयडी तत्पर नाही का, असाही सवाल न्यायालयाने केला. दाभोलकर, पानसरे हत्येचा
तपास प्रामाणिकपणे झालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्याचे आमचे कर्तव्य आहे,’ असेही न्यायालयाने सुनावले.
देखरेखीखाली तपास व्हावा
दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी करणाºया याचिका दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात दाखल केल्या.
हत्या झाल्या कधी?
दाभोलकर यांची हत्या २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात करण्यात आली. तर पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले. मात्र २० फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.