दाभोलकर हत्येचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा
By admin | Published: July 16, 2015 04:04 AM2015-07-16T04:04:53+5:302015-07-16T04:04:53+5:30
केंद्र आणि राज्य सरकार पुरेशा गांभीर्याने तपास करीत नसल्याची शंका येत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर
Next
पुणे : केंद्र आणि राज्य सरकार पुरेशा गांभीर्याने तपास करीत नसल्याची शंका येत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीत व्हावा, अशी मागणी अंनिसचे सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी बुधवारी केली. यासाठी अंनिसच्या वतीने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण होतील. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) या प्रकरणाचा तपास देऊनही काही प्रगती झालेली नाही.