दाभोलकर, पानसरे प्रकरणाचा तपास एकांगी - सनातन

By admin | Published: November 27, 2015 02:51 AM2015-11-27T02:51:56+5:302015-11-27T02:51:56+5:30

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यंत्रणा दाभोलकर आणि पानसरे हत्येचा तपास एकांगी आणि खोट्या सिद्धान्तावर करत आहे

Dabholkar, Pansare investigate the case Ekangi - Sanatan | दाभोलकर, पानसरे प्रकरणाचा तपास एकांगी - सनातन

दाभोलकर, पानसरे प्रकरणाचा तपास एकांगी - सनातन

Next

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यंत्रणा दाभोलकर आणि पानसरे हत्येचा तपास एकांगी आणि खोट्या सिद्धान्तावर करत आहे, असा आरोप सनातन संस्थेने गुरुवारी केला. सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर सनातनच्या साधकांना या प्रकरणात गोवत असल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणीही सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी या वेळी केली आहे.
वर्तक म्हणाले की, सनातनचे साधक हेमंत शिंदे, नीलेश शिंदे, नीरज येनगूल, महेंद्र सहस्रबुद्धे, यशवंत सहस्रबुद्धे, गजानन केसरकर, कृष्णा कुंभार या साधकांच्या मोबाइल क्रमाकांच्या रोमिंग पॅटर्नवर हा तपास सुरू आहे. पहाटे व्यामशाळेत जाणारा, वर्तमानपत्राचे वितरण करणाऱ्या साधकांच्या मोबाइलचे रोमिंग पॅटर्न चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा सीबीआयचा प्रयत्न सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी सीबीआय सनातनच्या साधकांना खुनी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव व अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केला. पुनाळेकर म्हणाले की, केवळ एक दिवसाचे रोमिंग दाखवणारे नायर खुनाच्या आदल्या आणि खुनानंतरचे रोमिंग न्यायालयापासून लपवत ठेवत आहेत. परिणामी, नायर यांच्या वर्तनाविषयी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. चौकशी होईपर्यंत नायर यांना निलंबित करून त्यांचे भूतकाळातील वर्तन तपासावे. शिवाय त्यांना सेवामुक्त करून तुरुंगात पाठवण्याची मागणीही सनातनने एका पत्राद्वारे सीबीआयचे दिल्ली कार्यालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Web Title: Dabholkar, Pansare investigate the case Ekangi - Sanatan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.